● रस्त्याच्या दुरुस्तीची केली होती मागणी
रोखठोक | शहरा लगत असलेल्या गणेशपुर येथील प्रभाग क्र 2 च्या इंदिरानगर भागातील हायवे वरुन येणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनातुन केली होती. याकरीता पंधरा दिवसाचा अल्टीमेटम देण्यात आला होता माञ कोणतीही दखल घेण्यात न आल्याने समितीच्या कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी तो जीवघेणा रस्ता अखेर बुधवारी बंद केला आहे. The workers of the committee and citizens have finally closed that dangerous road on Wednesday.

छत्रपती महोत्सव समिती व इंदिरा नगर वस्तीतील नागरिकांनी मागील 3 एप्रिलला ग्रामपंचायत व पंचायत समिती यांना निवेदन दिले होते. अतिशय बिकट अवस्था रस्त्याची झाली होती. यामुळे लहानसहान अपघात नित्याचेच झाले होते. मोठा अपघात घडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्याप्रमाणेच त्या रस्त्यावर दोन अपघात झाल्यामुळें नागरिकांनी हा रस्ता बंद केला आहे.
जोपर्यंत रस्ता दुरुस्त होणार नाही तो पर्यंत हा रस्ता बंद राहणार असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले असुन याप्रसंगी विवेक ठाकरे, गणेश काकडे, भगवान मोहिते, प्रशांत काळे, राहुल घुगुल, अरविंद ठाकरे, विकास पेंदोर, गौरव काळे, स्वप्नील थेरे, दीपक मालेकर, सतीश गेडाम, रोशन काकडे, अरविंद काळे, शरद गेडाम व मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होते.
वणी : बातमीदार