Home Breaking News उंबरकरांचे व्हिजन…20 हजार बेरोजगारांना देणार रोजगार…!

उंबरकरांचे व्हिजन…20 हजार बेरोजगारांना देणार रोजगार…!

● मनसेचे उमेदवार राजु उंबरकर यांची ग्वाही

C1 20241114 14382056

मनसेचे उमेदवार राजु उंबरकर यांची ग्वाही

Political News : मतदारसंघात अनेक कोळसा खानी आणि विविध कंपन्या असून सुद्धा येथील युवक बेरोजगारच आहे. त्यामुळे मी निवडून आल्यानंतर सर्वप्रथम मतदारसंघातील 20 हजार युवकांच्या हाताला काम मिळवून देत त्यांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याची शाश्वती मनसेचे उमेदवार राजू उंबरकर यांनी दिली. Umbarkar’s vision… to provide employment to 20 thousand unemployed…!

वणी आणि परिसरात विपुल खनिज संपत्ती आहे. ज्यात दगडी कोळसा, डोलामाईट, लाईमस्टोन मिळतो. तर याच आधारे काम करणाऱ्या अनेक कंपन्या सुध्दा या भागात कार्यरत आहे. तर अलीकडे बिरला उद्योग समूहाची सिमेंट कंपनी सुध्दा मुकुटबन येथे स्थापन झाली. रोजगाराच्या दृष्टीने एवढी उपलब्धी असताना सुद्धा येथील युवकाच्या हाताला काम नाहीं तो पूर्णपणे बेरोजगार आहे.

मतदारसंघातील तरुण युवक बेरोजगारीपायी अनेकदा नैराश्य आणि नैराश्यातून जीवन संपविण्याच्या घटना घडल्या. उच्च शिक्षित असून त्यांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होत नसल्याने अनेक युवक पुणे-मुंबई सारख्या महानगराची वाट धरतात. या सर्वांवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने मागील वर्षी मनसेचे नेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

Img 20250103 Wa0009

मनसेच्‍या वतीने आयोजित रोजगार मेळाव्‍यात तब्‍बल सहा हजार सातशे  युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात आल्याचा दावा मनसेच्‍या वतीने करण्‍यात येत आहे. आता हीच शृंखला पुढें चालवत विधानसभेतील यशा नंतर 20 हजार युवकाच्या हाताला काम देणार असल्याची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार राजू उंबरकर यांनी केली.
Rokhthok News