Home Breaking News Ashwini Vaishnav : खा. देशमुखांचे रेल्वे मंत्र्यांना साकडे

Ashwini Vaishnav : खा. देशमुखांचे रेल्वे मंत्र्यांना साकडे

● वाशिम-बडनेरा रेल्वे मार्ग मंजूर करा

C1 20250202 13214628

वाशिम-बडनेरा रेल्वे मार्ग मंजूर करा

Political News | सुनील पाटील : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना अधिक चांगल्या रेल्वे सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि या भागाचा दळणवळणाच्या दृष्टीने विकास होण्यासाठी खा. संजय देशमुख यांनी रेल्‍वे मंत्र्यांना साकडे घातले. वाशिम- बडनेरा व वाशिम- पोहरादेवी- दिग्रस- माहूर-आदिलाबाद या दोन रेल्‍वे मार्गाच्‍या प्रस्‍तावांना लवकरात लवकर मंजुरी मिळावी यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे सोबत सविस्‍तर चर्चा करण्‍यात आली. A detailed discussion was held with Union Railway Minister Ashwini Vaishnav to get the railway proposals approved at the earliest.

वाशिम-पोहरादेवी-दिग्रस-माहूर-आदिलाबाद आणि वाशिम-बडनेरा हे रेल्वे मार्ग वाशिम जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. या दोन्ही मार्गांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी तातडीने मंजुरी देऊन आवश्यक निधी (बजेट) मंजूर करावा, अशी मागणी यावेळेस करण्यात आली.

वर्धा-नांदेड महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाला गती द्या!
वर्धा-नांदेड हा महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प संथ गतीने सुरू आहे. या प्रकल्पाला गती देऊन लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात,  यासंदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत चर्चा करण्‍यात आली.

Img 20250103 Wa0009

नवीन रेल्वे गाड्या सुरू करण्यासाठी मागणी:
1) नांदेड-नागपूर व्हाया अकोला-वाशिम पॅसेंजर गाडी सुरू करावी. 2) नांदेड-हरिद्वार व्हाया वाशिम नवीन रेल्वे गाडी सुरू करावी. 3) सूरत-भुसावळ एक्सप्रेस (क्रमांक 19006/07)  वाशिमपर्यंत विस्तार करावा. 4) तिरुपती-अकोला व्हाया वाशिम विशेष रेल्वे गाडी (क्रमांक 07606/07) शिरडीपर्यंत वाढवावी. 5) नांदेड-पटना विशेष रेल्वे गाडी (क्रमांक 07615/16) स्थायी करण्यात यावी. या गाडीमुळे वाराणसी, प्रयागराज, अयोध्या, बुद्धगया आणि पटना यासारख्या धार्मिक स्थळांसाठी प्रवाशांना कायमस्वरूपी सुविधा मिळेल. 6) नांदेड-कुर्ला रेल्वे गाडी (क्रमांक 17665/66 आणि 17667/68) तातडीने सुरू करावी. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने 29 ऑगस्ट 2023 रोजी नांदेड-कुर्ला व्हाया वाशिम-अकोला मार्गावर नवीन रेल्वे सुरू करण्याचे आदेश दिले होते. मात्र, दोन वर्षे उलटूनही ही गाडी सुरू झालेली नाही. त्यामुळे तातडीने कार्यवाही करून ही रेल्वे गाडी सुरू करण्यात यावी, याची देखील मागणी करण्यात आली.

“यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना उत्तम रेल्वे सुविधा मिळाव्यात, प्रवास अधिक सोयीस्कर आणि जलद व्हावा, तसेच धार्मिक व औद्योगिक स्थळांशी थेट जोडणी मिळावी, यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्‍याचे याप्रसंगी खासदार संजय देशमुख यांनी स्‍पष्‍ट केले.
Rokhthok News