Home Breaking News दूरसंचार सल्लागार समितीवर “विजय चोरडिया”

दूरसंचार सल्लागार समितीवर “विजय चोरडिया”

● केंद्र शासनाने निर्गमित केले आदेश

C1 20240110 22344214

केंद्र शासनाने निर्गमित केले आदेश

Wani News : भारत सरकारच्या अमरावती विभागीय दूरसंचार सल्लागार समितीच्या सदस्यपदी येथील प्रतिष्ठित व्यावसायिक तथा स्थानिक भाजपा नेते विजयबाबू चोरडिया यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे श्रेय त्यांनी पक्षाचे वरिष्ठ नेते तसेच आमदार मदन येरावार यांना दिले आहे. Vijay Chordia as member of Amravati Divisional Telecom Advisory Committee of Government of India

भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेते विजयबाबू चोरडिया हे सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवताहेत. आरोग्यविषयक शिबिरे, क्रीडा आणि तरुणाच्या सर्वांगीण विकासासाठी ते झटताहेत. विविध स्पर्धांचे आयोजन, त्यातच सांस्कृतिक कार्यक्रम, बालकांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी ते प्रयत्नशील असतात.

भारत सरकार दूरसंचार मंत्रालयाच्या दळणवळण विभागाने डिसेंबर महिन्यात परिपत्रक निर्गमित केले आहे. सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेवर विजय चोरडिया यांची अमरावती टेलिफोन सल्लागार समितीचे सदस्य म्हणून नामनिर्देशित केले आहे. त्यांच्या निवडीमुळे स्थानिक कार्यकर्त्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Rokhthok News

Img 20250103 Wa0009