Home Breaking News दत्तजयंतीला विजयबाबू चोरडिया यांचा सत्कार

दत्तजयंतीला विजयबाबू चोरडिया यांचा सत्कार

● श्री. मल्हारगड कवडशी येथे पार पडला सोहळा

C1 20231227 08063835
श्री. मल्हारगड कवडशी येथे पार पडला सोहळा

Wani News : तालुक्यातील कवडशी येथे दत्तजयंतीचा उत्साह बघायला मिळाला. हजारो भाविक भक्त यात्रेत सहभागी झाले होते. याप्रसंगी मंदिर समितीने प्रसिद्ध व्यावसायिक, दानशूर व्यक्तिमत्त्व, सामाजिक कार्यकर्ते विजयबाबू चोरडिया यांचा सत्कार करण्यात आला. Social activist Vijaybabu Chordia was felicitated.

मंगळवारी देशभरात दत्तजयंतीचा उत्साह पहायला मिळाला. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला. हिंदू धर्मानुसार भगवान दत्तात्रेयांची जयंती ही दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा आंशिक अवतार मानले जातात. या दिवशी अनेक ठिकाणी दत्तजयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

C1 20231227 08072015

श्री. मल्हारगड कवडशी येथे दत्तजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. दत्तात्रेयांची विधिवत पूजा-अर्चा केली जाते. तसेच धार्मिक कार्यक्रम व भजन, कीर्तनाचा लाभ भाविक भक्तांना मिळतो. यावेळी परिसरातील भक्तांची मांदियाळी बघायला मिळते.

Img 20250103 Wa0009

कवडशी येथे दत्तजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात विजयबाबू चोरडिया यांना आमंत्रित करण्यात आले होते. एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी मंदिर समितीचे आभार मानले. यावेळी हजारो भाविकांची उपस्थिती होती.
Rokhthok News