Home Breaking News शिवसेनेचे प्रसाद ठाकरे यांना पितृशोक

शिवसेनेचे प्रसाद ठाकरे यांना पितृशोक

● सोमवारी सकाळी अंत्यसंस्कार

C1 20241222 20452592

सोमवारी सकाळी अंत्यसंस्कार

Sad News | शिवसेना (उबाठा) गटाचे वणी येथील माजी तालुका प्रमुख प्रसाद ठाकरे यांचे वडील विनोद बाबारावजी ठाकरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 68 वर्षाचे होते, त्यांचेवर मूळ गावी वडाजापूर येथे सोमवारी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होणार आहे. Vinod Babaraoji Thackeray passed away after a brief illness

विनोद बाबारावजी ठाकरे हे वडाजापूर येथील निवासी होते तसेच प्रगतिशील शेतकरी तसेच अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे होते. ते मागील काही महिन्यांपासून आजारी होते. रविवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पश्चात खूप मोठा गोतावळा आहे. त्यांचेवर सोमवारी सकाळी 11 वाजता वडाजापूर येथील मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
(रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली)
Previous articleत्या…. आरोपीला न्यायालयाने ठोठावली जन्‍मठेप
Next articleमाजी आमदार नांदेकरांची New innings
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.