Home Breaking News सर्वसामान्यांचा आवाज, मनसेचा तडफदार शिलेदार

सर्वसामान्यांचा आवाज, मनसेचा तडफदार शिलेदार

● वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

C1 20250828 09564846
Img 20250910 wa0005
वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

Birthday News :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तडफदार महाराष्ट्र सैनिक, वाहतूक व्यवस्थेवर सातत्याने आवाज बुलंद करणारे व सर्वसामान्यांसाठी लढा देणारे नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे मनसे वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. Voice of the common man, MNS’s strong leadership

Img 20250103 Wa0009

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न असो वा अस्ताव्यस्त वाहतूक व्यवस्थेचा मुद्दा, इरशाद खान यांनी वेळोवेळी धाडसी भूमिका घेत वाहतूक शाखेला जाब विचारला आहे. शालेय ऑटो व स्कूल बस चालकांच्या बेफिकीरपणा थेट धारेवर धरून त्यांनी शेकडो पालकांच्या मनातील प्रश्नला आवाज दिला आहे.

“सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणे, आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हेच आपले ध्येय आहे” अशा ठाम भूमिकेमुळे इरशाद खान यांनी वेळप्रसंगी पोलीस प्रशासनाविरुद्धही आक्रमक पवित्रा अवलंबला आहे.

मनसे नेते राजू उंबरकर यांचे खंदे समर्थक असलेल्या इरशाद खान यांनी संघटनात्मक बांधणीसाठी सातत्याने परिश्रम घेतले आहेत. टोलमाफीसाठी केलेले आंदोलन विशेष गाजले होते. 20 किलोमीटर अंतराच्या आत वास्तव्यास राहणाऱ्या व प्रवास करणाऱ्या वाहनचालकांकडून टोल आकारणीचा प्रश्न उपस्थित करून त्यांनी लक्षवेधी लढा दिला होता.

इरशाद खान यांच्या नेतृत्वगुणांमुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट असून, वाढदिवसानिमित्त मनसे कार्यकर्त्यांकडून व विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
     (रोखठोक परिवाराकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा)