● नागरिकांत संताप, मनसेने केला पाणीपुरवठा
Wani News | निवडणुका लागल्या, अधिकारी निवडणूक कामात व्यस्त, मूलभूत कामाला बगल देत मुख्याधिकारी स्थानिकांना म्हणतात तक्रार करा. तीन दिवसांपासून पाण्यासाठी भटकंती, नागरिकांत संताप. ही बाब मनसे चे नेते राजू उंबरकरांना कळली आणि सामाजिक दायित्व जपत पाणी पुरवठा केला. Wandering for water for three days, anger among citizens.
विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच प्रशासनाने मूलभूत कामाकडे लक्षदेणे गरजेचे आहे. जैन लेआऊट परिसरात डी पी रोड परिसरात केर-कचरा सफाई करत असताना जेसीबी मुळे पाणी पुरवठा होत असलेली पाईपलाईन फुटली. तीन दिवसांपासून परिसरात पाणीपुरवठा होत नाही. स्थनिकांनी पालिका मुख्याधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. मात्र ते म्हणतात तक्रार करा, तर कंत्राटदार म्हणतो कामगार नाहीत.
स्थानिकांना पाण्यासाठी मानवनिर्मित टंचाईमुळे भटकंती करावी लागत आहे. त्यांच्यात प्रशासनाबाबत रोष उत्पन्न होतोय. ही बाब मनसेचे माजी शहर प्रमुख संतोष कोणप्रतीवर यांना समजली. त्यांनी उंबरकरांना सांगितले व स्थानिक नागरिकांसाठी टँकरने पाणी पुरवठा केला. सोमवारी दुपारी पालिकेने पाईपलाईन चे काम केले असून तीन दिवस स्थानिकांना नाहक त्रास सहन करावा लागला.
Rokhthok News






