Home Breaking News Wani News | पशुसंवर्धन कार्यालयात सोडल्‍या आजारी शेळ्या

Wani News | पशुसंवर्धन कार्यालयात सोडल्‍या आजारी शेळ्या

● पशु चिकित्सकांची पदे रिक्‍त ● वंचित बहुजन आघाडीचे अनोखे आंदोलन

C1 20231020 17320278

पशु चिकित्सकांची पदे रिक्‍त
वंचित बहुजन आघाडीचे अनोखे आंदोलन

animal husbandry news | पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पशु संवर्धन विभागात पशु चिकित्सकांची पदे रिक्‍त आहेत. पशुधनांवर उपचार करणे कठीण झाल्‍यामुळे शेतकऱ्यांना नाहक ञास सहन करावा लागत आहे. आजारी शेळयांवर स्‍टीकर चिकटवून चक्‍क पशु संवर्धन विभागाच्‍या कार्यालयात सोडण्‍यात आल्‍या. हे अनोखे आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे दिलीप भोयर यांच्या नेतृत्वात शुक्रवारी दुपारी करण्‍यात आले. There are vacancies for veterinary surgeons in animal husbandry department under Panchayat Samiti.

C1 20231020 17313982

पशु संवर्धन विभागात अनेक पदे रिक्त आहेत यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व पशु पालकांच्या जनावरांना सुरळीत उपचार मिळत नाही. जनावरे  विविध आजाराने मृत्‍यूमुखी पडताहेत. तालुक्यात श्रेणी 1 ची पाच तर श्रेणी 2 ची आठ रुग्णालये असून यातील श्रेणी 2 ची पाच पदे रिक्त आहे तर श्रेणी 2 ची चार पदे रिक्त असुन विस्तार अधिकारी देखील रिक्त आहे.

पशु संवर्धन विभागातील रिक्‍त पदांचे ग्रहण शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसले आहेत. पशु चिकित्सकांच्या रिक्त पदांमुळे पशुधनांवर उपचार करणे कठीण झाले आहे. यातच अनेक जनावरे मृत्‍यूमुखी पडताहेत यामुळे पशु पालकांचे आर्थिक नुकसान होत आहे. प्रशासनाने तातडीने रिक्‍तपदे भरावी अशी मागणी आंदोलनकर्त्‍यांनी केली आहे.

Img 20250103 Wa0009

याप्रसंगी जिल्हाउपाध्यक्ष मंगल तेलंग, शहराध्यक्ष किशोर मुन, युवा आघाडीचे अध्यक्ष विशाल कांबळे,  महिला आघाडीच्या जिल्हा महासचिव अर्चना कांबळे, जिल्हा उपाध्यक्षा वैशाली गायकवाड, जिल्हा संघटक ताई डोंगरे,  तालुकाध्यक्षा शारदा मेश्राम,  शहराध्यक्षा अर्चना नगराळे, उपाध्यक्षा प्राणिता ठमके, अर्चना दुर्गे, सीद्धी करमनकर, अंजु पासवान,  सुनीता दुपारे,  कीर्ती लभाने, कपिल मेश्राम, सोनू दुर्गे, पिंटू डगावकर,  चेतन रामटेके, अमोल दुपारे, अंकित पिदूरकर यांची उपस्थिती होती.
Rokhthok News