● निकृष्ट बांधकामांचे ताजे उदाहरण
Wani News | संपुर्ण शहरात सिमेंट कॉक्रीट रस्त्याचे जाळे विनल्या जात आहे. बांधकाम कसं होत आहे, याबाबत अधिकारी व लोकप्रतिनिधी अनभिज्ञ असल्याचे जाणवत असलं तरी सर्वसामान्य जनतेला माञ नाहक ञास सहन करावा लागत आहे. न्यायाधीश यांच्या घरासमोरील कॉक्रीट रस्त्यावर साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावून रस्ता योग्य पध्दतीने निर्माण करावा अशी मागणी मनसेचे माजी शहर प्रमुख संतोष कोनप्रतिवार यांनी केली आहे. Former MNS city chief Santosh Konpratiwar has demanded that the road should be constructed in a proper manner.

न्यायाधीश, उपविभागीय अधिकारी तसेच आमदारांला सुध्दा याच मार्गावरुन सतत मार्गक्रमण करावे लागते. न्यायालय, पोलीस ठाणे, तहसील कार्यालय, पंचायत समिती आदी ठिकाणी याच मार्गावरुन सर्वसामान्य जनतेला ये- जा करावी लागते. रस्त्याला तळयाचे स्वरुप आलेले आहे. अनेक दिवसांपासुन पाणी साचलेले असतांना प्रशासन माञ हतबल असल्याचे दिसत आहे.
वणी शहरातील संपुर्ण सिमेंट कॉक्रीटचे रस्ते निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप सुध्दा कोनप्रतिवार यांनी केला आहे. रस्ता बांधकामाकडे लोकप्रतिनिधी यांचे अजिबात लक्ष नसल्याचे सुध्दा यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. शासनाच्या लाखो रुपये निधीचा होत असलेला अपहार थांबवावा अन्यथा सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेवून आंदोलनात्मक पाविञा घ्यावा लागेल असे कोनप्रतिवार म्हणाले.
न्यायाधीश यांच्या घरासमोरील कॉक्रीट रस्त्यावर साचलेल्या पाण्याची तात्काळ विल्हेवाट लावावी व नव्याने रस्त्याचे बांधकाम योग्य पध्दतीने करावे अशी मागणी सर्वसामान्य नागरीकांची आहे. साचलेल्या पाण्यामुळे लहानसहान अपघात नित्याचेच झाले आहे. पायदळ चालणाऱ्या नागरीकांना कसरत करत रस्ता पार करावा लागत आहे. कंञाटदाराने रस्त्याचे बांधकाम थातुरमातुर केले आहे. तरी संबधीत विभागाने तात्काळ उपाययोजना करावी व लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.
Rokhthok News