Home Breaking News वरोरा जवळ भीषण अपघात, वणीतील डॉक्टर ठार

वरोरा जवळ भीषण अपघात, वणीतील डॉक्टर ठार

● कार आणि ट्रक समोरासमोर भिडले

● कार आणि ट्रक समोरासमोर भिडले

रोखठोक | वरोरा शहराजवळ भरधाव ट्रक ने वणीकडे येत असलेल्या कार ला जबर धडक दिली. तर तब्बल अर्धा किलोमीटर पर्यंत कारला खेचत नेले. या भीषण अपघातात येथील तरुण महिला डॉक्टरचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी झाले असून त्यांना चंद्रपूर उपचारार्थ हलवले आहे. ही दुर्दैवी घटना बुधवार दि. 22 मार्चला दुपारी 3 वाजताच्या दरम्यान घडली.

डॉ. अश्विनी गौरकार- झाडे (31) असे मृतक डॉक्टर चे नाव आहे त्या पाच नंबर शाळे जवळ वास्तव्यास होत्या. तर त्या तीन दिवसापूर्वी येथील ग्रामीण रुग्णालयात कर्तव्यावर रुजू झाल्या होत्या. त्यांचे पती डॉ. अतुल गौरकार हे या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. ते वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे कर्तव्य बजावत होते.

IMG 20261102 WA0001

डॉक्टर दाम्पत्य MH-34- AM- 4240 या कार ने वणीकडे येत होते तर विरुद्ध दिशेने ट्रक क्रमांक MH- 34- BZ- 2996 हा ट्रक भरधाव वेगात होता. अचानक दोन्ही वाहने समोरासमोर भिडली. अपघात भीषण होता, यावेळी स्थानिक नागरिकांनी गर्दी केली. तसेच पोलिसांना सुचविण्यात आले. जखमींला तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले.

Img 20250103 Wa0009

घडलेल्या घटनेने शहरात चांगलीच खळबळ माजली असून तरुण डॉक्टर च्या अनपेक्षित मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस तपास करत असून उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांना सोपविण्यात येणार आहे. मृतक डॉ. अश्विनीला लहानगे बाळ असल्याचे बोलल्या जात आहे.
वणी: बातमीदार

ही बातमी देखील वाचा…

https://rokhthok.com/2023/03/22/19360/