*अत्याचाराचा गुन्हा दाखल

वणी बातमीदार : राजूर (कॉलरी) येथील अल्पवयीन बलिकेला फूस लावून पळविणाऱ्या 19 वर्षीय मजनूला 50 दिवसांनी अटक करण्यात वणी पोलिसांना यश आले. तांत्रिक बाबीचा अवलंब करीत मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी गोंदिया जिल्ह्यातील केळवण या गावातून ताब्यात घेतले. त्यांचेवर वणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे
मयूर बलदेव शाहारे(19)रा केळवण ता. अर्जुनी मोरगाव जि. गोंदिया असे अटक करण्यात आलेल्या मजनुचे नाव आहे. कामाच्या शोधात तो राजूर (कॉलरी) येथे आला होता. याच दरम्यान राजूर येथील अल्पवयीन मुलीला त्याने आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले व तिला फुसलाऊन पळवून नेले होते.
मुलीच्या पालकांनी दि 19 जून ला मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार वणी पोलिसात दिली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलीस मयूर च्या मागावर होती, मोबाईल लोकेशन चा आधार घेत पोलिसांनी मयूर ला गोंदीया येथून रात्री ला अटक केली व अल्पवयीन मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन केले. त्याचेवर भादवि कलम 366 A, 376(2), J, N 4, 6 बाल लैंगिक अत्याचार कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता दि. 11 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि शिवाजी टिपूर्णे व शिपाई अमोल नूनेलवार करीत आहे.