* तीन आरोपी अटकेत, 10 हजाराचा मुद्देमाल जप्त
वणी बातमीदार: तालुक्यातील उकणी कोळसा खान परिसरातुन 10 हजार रुपये किमतीचा 25 फूट केबल चोरीला गेल्याची तक्रार शिरपूर पोलिसात दि.13 ऑगस्ट ला नोंद करण्यात आली होती. ठाणेदार सचिन लूले यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून तपास यंत्रणा कार्यान्वित करून अवघ्या दोन तासात तीन आरोपींच्या मुसक्या आवळत मुद्देमाल जप्त केला.

महेश वासु दुर्गे (22), नासीम निजामुद्दीन शेख (31), श्रीकांत सुरेश आगदारी (28) तिघेही चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथील रहिवासी आहेत. थातुरमातुर चोऱ्या करून आपली उपजीविका भागवणाऱ्या या तिघांनी उकणी कोळसा खाणीतून केबल चोरी केली. या प्रकरणी शिरपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
केबल चोरी बाबत गुन्हा नोंद होताच ठाणेदार सचिन लूले पथकासह घटनास्थळी रवाना झाले. या प्रकरणी पोलिसांनी तांत्रीक व पारंपारीक पध्दतीचा उपयोग करून अवघ्या दोन तासात गुन्हयातील आरोपीचा ठावठिकाणा शोधला. परिसरातील एका नाल्यात केबल जाळून त्यातील तांबे विकण्याच्या तयारीत असलेल्या तिघांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे काबुल केले.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, अपर पोलीस अधिक्षक डॉ. खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार यांचे मार्गदर्शनात शिरपुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन लुले, प्रमोद जुनुनकर, अनिल सुरपाम, विनोद मोतेराव, विजय फुल्लुके यांनी पार पाडली.