घातपाताचा संशय
बोटोणी : राहुल आत्राम: तालुक्यातील घोडदरा शिवारात असलेल्या शेतात एका 22 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शरीराच्या वेगवेगळ्या भागात जखमेचे व्रण असल्याने त्याची हत्या झाली असावी असा कयास व्यक्त केल्या जात आहे.

प्रमोद नामदेव रामपुरे (22) हा अर्जुनी येथील निवासी आहे. घोडदरा शिवारात असलेल्या गजानन धनवे यांच्या शेतात त्या युवकाचा मृतदेह आढळून आल्याने तर्कवितर्कला उधाण आले आहे. नेमका कशामुळे मृत्यू झाला याबाबत साशंकता व्यक्त केल्या जात आहे. दरम्यान निळी जीन्स पॅन्ट, चौखडा शर्ट व बूट परिधान केला आहे. मृतकाची ओळख निष्पन्न करण्यात पोलिसांना यश आले आहे. परिणामी त्याच्या शरीरावर असलेल्या जखमां व परिस्थितीजन्य स्थितीवरून त्याचा खून झाला असावा असा कयास व्यक्त केला जात आहे.