Home क्राईम त्या.. युवकाच्या हत्येप्रकरणी धागेदोरे गवसले ?

त्या.. युवकाच्या हत्येप्रकरणी धागेदोरे गवसले ?

Img 20250910 wa0005

*मारेगाव पोलीस संशयितांच्या मागावर

Img 20250103 Wa0009

मारेगाव बातमीदार: दीपक डोहणे : तालुक्यातील अर्जुनी येथील युवकाच्या हत्येप्रकरणी मारेगाव पोलिसांनाधागेदोरे गवसले असून संशायितास जेरबंद करण्यासाठी पोलीस मागावर आहे. परिणामी  ‘त्या’ संशायितांनी गावातून पोबारा केल्याची विश्वसनीय माहिती आहे.

मारेगाव तालुक्यातील घोडदरा शिवारात गुरुवारला अर्जुनी येथील युवकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला. दरम्यान पोलिसांनी मृत्यू चे कारण अवगत करण्यासाठी जलदगतीने सूत्रे हलविली.

मृतक प्रमोद नामदेव रामपुरे रा. अर्जुनी हा आपल्या गणगोतांना भेटण्यासाठी खेकडवाई येथे आला होता. येथील दोघांसोबत तो घोडदरा येथे पायी जात असताना अनेकांच्या नजरेत पडल्याची माहिती आहे. या तिघात कुठल्यातरी कारणाने वाद निर्माण होऊन शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले यातच प्रमोद चा मृत्यू झाला आणि मृतदेह शिवारात नेऊन टाकला असावा अशी घटना स्थळावर सापडलेल्या चप्पल वरून कयास लावण्यात येत आहे. परिणामी जे सोबत होते त्यांनी गावातून पोबारा केल्याची माहिती आहे. पोलीस त्यांच्या मागावर असून लवकरच त्यांना गजाआड करण्यासाठी जलदगतीने पोलिसांची सूत्रे हलली आहे. संशायित सापडताच  मृत्यूचे चित्र स्पष्ट होणार आहे