Home क्राईम कुऱ्हाडीने मारहाण, दोघे गंभीर जखमी

कुऱ्हाडीने मारहाण, दोघे गंभीर जखमी

● शेतीचा वाद, चौघांवर गुन्‍हे दाखल

C1 20241018 12012239

शेतीचा वाद, चौघांवर गुन्‍हे दाखल

Crime News | तालुक्‍यातील भुरकी येथे गुरुवार दिनांक 17 ऑक्‍टोबरला राञी 7 वाजताच्‍या सुमारास चौघांनी बाप- लेकाला कुऱ्हाडीने मारहाण केली. यात दोघांनाही गंभीर दुखापती झाल्‍या. तक्रारीअंती एकाच परिवारातील चौघांवर विविध कलमान्‍वये गुन्‍हे दाखल करण्‍यात आले आहे. The four beat the father and daughter with an axe

श्रीराम कृष्णाजी बदकी (57), दिलीप कृष्णाजी बदकी (52), अशोक कृष्णाजी बदकी (48), मयुर दिलीप बदकी (21) असे गुन्‍हा नोंद झालेल्‍या आरोपींचे नांव आहे. गुरुवारी सायंकाळी अक्षय शालीक भोयर (27) व शालीक नानाजी भोयर हे बाप -लेक आपल्‍या शेतातुन घरी परतत होते. श्रीराम बदकी यांचे शेताचे धुऱ्यावरून जात असतांना जुना वाद उफाळुन आला आणि शाब्‍दीक वादावादीचे रुपांतर मारहाणीत झाले.

एक महिण्या पुर्वी दिलीप कृष्णाजी बदकी यांनी येण्याजाण्याच्या रस्त्यावर करंटचा तार लावला होता त्यामुळे भोयर व बदकी यांचेत वाद झाला होता. गुरुवारी ते वहीवाट असलेल्‍या दधुऱ्यावरून जात असतांना त्‍यांना आवाज देत थांबवले व शिवीगाळ करण्‍यात आली. अशोक बदकी यांनी हातातील कुऱ्हाडीने शालीक भोयर यांचेवर हल्‍ला चढवला यात त्‍यांच्‍या डोक्‍याला जबर मार लागल्‍याने ते खाली कोसळले. हे बघताच मुलगा अक्षय धावून आला असता त्‍याला सुध्‍दा कुऱ्हाडीने मारहाण केली.

Img 20250103 Wa0009

याघटने नंतर जखमी बाप लेकाला रुग्‍णांलयात उपचारार्थ दाखल करण्‍यात आले. शालीक यांची प्रकृती गंभीर असल्‍याने त्‍यांना चंद्रपुरला हलविण्‍यात आले आहे. अक्षय भोयर यांचे तक्रारीवरुन पोलीसांनी चौघांवर भारतीय न्‍याय संहिता कलम 109 (1), 118 (1), 352, 351 (2), 351 (3) व 3 (5) अन्‍वये गुन्‍हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
Rokhthok News