Home क्राईम फरार सराईत चोरटा “गब्‍या” अखेर ‘जेरबंद’

फरार सराईत चोरटा “गब्‍या” अखेर ‘जेरबंद’

● पोलीसांच्‍या हातावर तुरी देवून झाला होता पसार

पोलीसांच्‍या हातावर तुरी देवून झाला होता पसार

Crime News Wani | पोलीस प्रशासनाला चकमा देत मागील दोन वर्षापासुन पसार असलेला सराईत चोरटा ‘गब्ब्या’ अखेर पोलीसांच्‍या जाळयात अडकला आहे. रविवारी नागपूर येथे त्याच्या भावाचे लग्न होते त्यासाठी तो तेथे येणार असल्याची गोपनीय माहिती ठाणेदारांना मिळाली होती. वणी पोलिसांनी सापळा रचला असता शनिवार दि. 10 जुनला सायंकाळी साडेसहा वाजता त्याला ताब्यात घेण्यात आले. The inn thief ‘Gabbya’, who has been on the run for the last two years while evading the police administration, has finally been caught in the police’s net.

नावेद उर्फ गब्या मो कादिर (42) रा. मोमीनपुरा असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. ‘गब्या’ हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्या शिरावर अनेक गुन्ह्याची नोंद आहे. त्याला यापूर्वी न्यायालयाने चोरीच्या गुन्ह्यात शिक्षाही ठोठावली होती. न्‍यायालयातुन सुटून आल्‍यावर तो पुन्‍हा शहरातील बंद दुकानात डल्‍ला मारायचा.

चोरीच्‍या प्रकरणात त्‍याला शिक्षा झाल्‍यावर त्‍याला कारागृहात ठेवण्‍यात आले होते. यवतमाळ कारागृहातुन त्याला आरोग्य तपासणीसाठी नेले होते तेथून परतत असताना  त्‍यांने पोलीसांच्‍या हातावर तुरी देवून पलायन केले होते. तेव्‍हा पासुन तो पसार होता यादरम्‍यान त्‍याने शहरात चोरीचा सपाटा लावला होता. अशीच चोरी करतांना त्‍यांने येथील पञकारांवर प्राणघातक हल्‍ला केला होता तेव्‍हा पासुन पोलीस त्‍याचा शोध घेत होते.

Img 20250103 Wa0009

पोलीसांना चकमा देण्‍यात वस्‍ताद असलेल्‍या गब्‍याची चोरी करण्‍याची पध्‍दत माञ हटके होती. तो एकटाच बंद दुकान अ‍थवा बंद घरे हेरायचा आणि कृत्‍याला अंजाम दयायचा. त्‍याची “मोडस ऑपरेंडी” पोलीस प्रशासनाला चांगलीच अवगत होती. त्‍यातच तो मोबाईल फोन वापरत नसल्‍याने तांञीकदृष्‍टया त्‍याला घेरणे पोलीसांना अवघड जात होते. तसेच तो येथील मोमीन पुरा येथे वास्‍तव्‍यास असलेल्‍या नातेवाईकांच्‍या फारसा संपर्कात नसल्‍याने पोलीसांना त्‍याचा ठाव लागत नव्‍हता.

स्‍थानिक पोलीस तसेच गुन्‍हे शोध पथक हे त्‍याचा ठाव ठिकाणा शोधण्‍यासाठी जाळे टाकुन असतानाच प्राप्‍त गोपनिय माहितीच्‍या आधारे गब्‍याला शिताफीने ताब्‍यात घेण्‍यात आले. हि कारवाई जिल्‍हा पोलीस अधिक्षक डॉ. पवन बनसोडे (dr. Pavan bansode), अप्‍पर पोलीस अधिक्षक पियुष जगताप (piyush jagtap), उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे (ganesh kindre) यांच्‍या मार्गदर्शनात ठाणेदार प्रदिप शिरस्‍कार यांच्या मार्गदर्शनाखाली API माधव शिंदे, सुहास मंदावार, विशाल गेडाम व सचिन मडकाम यांनी ही महत्वपूर्ण कामगीरी बजावली.
Rokhthok News