Home क्राईम LCB RAID : त्याने शेतातच लावला गांजा

LCB RAID : त्याने शेतातच लावला गांजा

● 84 हजाराचा मुद्देमाल जप्त

1574
C1 20231106 08140372

84 हजाराचा मुद्देमाल जप्त

Crime News : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (LCB) राळेगांव हद्दीतील ग्राम गोपालनगर येथील शेतात धाड (raid) टाकली. गांजाच्या 60 झाडांची लागवड केल्याचे आढळून आले. याप्रकरणी 60 वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेत 84 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शनिवारी दुपारी करण्यात आली. A team of the Local Crime Branch (LCB) raided a farm at village Gopalnagar in Ralegaon.

Img 20250422 wa0027

शंकर गणपत काळे (60) असे ताब्यातील व्यक्तीचे नाव आहे. ते राळेगाव तालुक्यातील गोपालनगर येथे वास्तव्यास आहे तर त्याच शिवारात त्यांची शेती आहे. स्वतःची तल्लफ भागवण्यासाठी व विक्रीकरिता त्याने शेतात चक्क गांजाची झाडे लावली होती.

Img 20250103 Wa0009

जिल्हयातून अमली पदार्थाचा समुळ नायनाट व्हावा याकरिता पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी ‘नशामुक्त पहाट’ हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला व अधिनस्त अधिकाऱ्यांना जिल्हयात कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थाची लागवड. वाहतुक, विक्री, सेवन होणार नाही याबाबत कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक राळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने गोपालनगर येथील शेतात धाडसत्र अवलंबले. शेतात एक इसम दिसून आला त्याला विचारणा केली असता शेत त्याचाच मालकीचे असल्याचे त्याने स्पष्ट केले. शेतात कापूस व तुरीची लागवड केलेली होती.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाहणी केली असता तुरीच्या ओळीत गांजाची 60 झाडे आढळून आली. त्याची खोडे व पान, शेंडे वेगळी करून मोजणी करण्यात आली. गांजाच्या झाडाचे खोडाचे एकुण वजन 23 किलो 280 ग्रॅम तर पाने, शेंडे व फुले यांचे वजन 16 किलो 840 ग्रॅम भरली. 84 हजाराचा मुद्देमाल जप्त करून शंकर काळे याना ताब्यात घेत NDPS कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांचे मार्गदर्शनात LCB प्रमुख आधासिंग सोनोने, पोलीस निरीक्षक, रामकृष्ण जाधव, API अतुल मोहनकर, API अमोल मुडे, विवेक देशमुख, सुनिल खंडागळे, योगेश डगवार.. सुधिर पांडे, सुधिर पिदुरकर, भोजराज करपते, निलेश निमकर, रजनिकांत मडावी, सतिष फुके, विवेक पेठे, गणेश हुलके, रुपेश जाधव, सुरज गावंडे यांनी केली.
ROKHTHOK NEWS