● बाजारासाठी घटस्थापनेच्या मुहूर्त ?
Crime News Wani | शेतकऱ्यांचे खरिप हंगामातील शेतपिके बाजारात यायला लागली की कोंबडबाजाराला उपविभागात चांगलाच उत येतो. कोंबड बाजार म्हणजे जंगलातील याञाच असते, अनेक दर्दी, कोंबड्याच्या झुंजीवर हारजित करतात. दोन दिवसांपुर्वी मारेगांव हद्दीत कोंबड बाजाराची रंगीत तालीम पार पडली. The forested areas of the sub-division are considered ‘safe’ places for “kombad bazar”
उपविभागातील जंगलव्याप्त भाग कोंबड बाजारासाठी ‘सेफ’ ठिकाण समजल्या जाते. मारेगांव तालुक्यातील गोदनी शिवारातील निशानघाट, केगांव – वेगांव शिवार, सुसरी – पेंढरी, लाखापुर- नेत शिवार आदी भागातील मोका पाहणी कोंबड बाजार भरवणाऱ्या महाभागांनी केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
शुक्रवारी भांदेवाडा परिसरात वणी पोलीसांचे पथक गस्त करत असतांना गोपनीय बातमीदाराने कोंबडबाजार सुरु असल्याचे सांगीतले. पोलीसांनी कोंबड बाजार भरवलेल्या ठिकाणी धाड टाकली होती. माञ ती हदद मारेगांव पोलीसांची असल्याचे समजल्याने व्यत्यय आला. पोलीसांचे वाहन बघताच जुगाऱ्यांनी पळ काढला. अखेर मारेगांव पोलीसांना पाचारण करण्यात आले व थातुरमातूर कारवाई करण्यात आली.
उपविभागात कोंबड बाजाराला सुगीचे दिवस येत असल्याचे दिसत आहे. पोलीसांच्या मूकसंमती शिवाय कोणतेही अवैद्य व्यवसाय तग धरु शकत नाही हे सत्य नाकारता येत नाही. मारेगांव तालुक्यात कोंबड बाजाराची रंगीत तालीम पार पडली आहे.
मंगळवार, बुधवार, शुक्रवार व रविवारी भरणाऱ्या कोंबड बाजाराकडे जुगाऱ्यांचे लक्ष लागले आहे. अद्याप वणी व शिरपुर पोलीस स्टेशनच्या हददीत कोंबड बाजार बाबतच्या हालचालींनी जोर पकडला नाही. मात्र मारेगाव सज्ज झाले आहे. कोंबड बाजार सुरू राहणार का हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Rokhthok News






