Home क्राईम sand theft : पोलिसांची कारवाई, दोघे अटकेत

sand theft : पोलिसांची कारवाई, दोघे अटकेत

● साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त ● महसूल प्रशासन कुंभाकर्णी झोपेत

C1 20250908 11465752
Img 20250910 wa0005

साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त
महसूल प्रशासन कुंभाकर्णी झोपेत

Crime News :
तालुक्यात अवैध sand theft रेती चोरीचा धडाका सुरू आहे. ग्रामीण भागात बिनधास्त चाललेल्या रेती तस्करीवर आळा बसविण्यात महसूल प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहेत. पोलिसांनी मुर्धोनी परिसरात पहाटे धडक कारवाई करत दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत तर साडेसहा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Large-scale sand theft in the taluka, police action,

Img 20250103 Wa0009

विलास रमेश आडे (30) रा. वाघदरा व तुळशिराम भगवान काकडे (32) रा. गोकुळ नगर, वणी, या दोन रेती चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळावरून आरटीओ क्रमांक नसलेला महिंद्रा ट्रॅक्टर, ट्रॉली व एक ब्रास रेती असा तब्बल साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

शासनाची कोणतीही परवानगी न घेता चालविलेल्या या sand theft रेती तस्करीवर भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 303(2), 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुदाम आसोरे हे करत आहेत.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या आदेशाने PSI सुदाम आसोरे, पो.का. श्याम, पो.का. विकास, पो.का. वसीम यांनी केली.
ROKHTHOK