● वेकोली वसाहतीच्या जागेत सुरू होता जुगार
Wani News | तालुक्यातील राजूर कॉलरी परिसरातील वेकोली (wcl) वसाहतीतील पडक्या इमारती लगत जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. तात्काळ घटनास्थळ गाठून धाड टाकली असता सात जुगाऱ्याना ताब्यात घेत दीड लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई रविवार दि. 23 जुलै ला सायंकाळी साडेसहा वाजता करण्यात आली. Seven gamblers were arrested and valuables worth one and a half lakh were seized.
श्रीराम नारायण डवरे (60), शुभम माणिक खैरे (26), राजेंद्र बाबूलाल केवट (42), नानाजी गणपत झाडे (60), डोमा परसराम कांबळे (70), अमरदीप प्रकाश नगराळे (36), प्रशिल दिलीप कांबळे (32) असे अटकेतील जुगाऱ्यांची नावे आहेत. ते सर्व राजूर कॉलरी येथील निवासी आहेत.
राजूर कॉलरी येथे काही इसम पत्त्यावर हारजित चा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार अजित जाधव यांना मिळाली. त्यांनी सपोनि दत्ता पेंडकर व काही कर्मचाऱ्यांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनी जुगार अड्डयावर धाड टाकली असता 04 दुचाकी वाहन, 52 पत्ते व नगदी 6 हजार 700 रुपये असा एकूण 1लाख 51 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सात जुगाऱ्याना ताब्यात घेत महाराष्ट्र जुगार कायदा नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, sdpo गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अजित जाधव, सपोनि दत्ता पेंडकर व पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.
Rokhthok News






