Home क्राईम त्या…हत्येचा उलगडा झाला, दरोड्याचं काय..?

त्या…हत्येचा उलगडा झाला, दरोड्याचं काय..?

● रोड रॉबरी पर्यंत मजल गेली चोऱ्यांड्याची ● पोलिसांचं पोलिसिंग संपुष्टात आलंय का ?

C1 20240517 23101424

रोड रॉबरी पर्यंत मजल गेली चोऱ्यांड्याची
पोलिसांचं पोलिसिंग संपुष्टात आलंय का ?

Crime News | शहरातील पटवारी कॉलनीत दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. घरच्यांना बंदी करत नऊ लाख लुटले. काही कालावधीनंतर पळसोनी फाट्यावर चक्क चौकीदाराची हत्या करून लोखंडी सळाखीचे बंडल चोरले. तर नुकतेच अज्ञात लुटारूंनी रस्त्यात अडवले व मारहाण करुन रोकड व ऐवज लंपास केला. रोड रॉबरी पर्यंत चोऱ्यांड्याची मजल गेली आहे. पोलिसांनी “त्या” हत्येचा उलगडा केला. दरोडा व रोड रॉबरीचे आरोपी गळाला अद्याप लागले नाहीत. यामुळे पोलिसांचं पोलिसिंग संपुष्टात आलंय का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. The accused of robbery and road robbery have not been arrested yet.

धारदार चाकुच्‍या धाकावर घरातील तिघांना बंदी करत तब्‍बल आठ लाख 50 हजाराचे सुवर्णालंकार व 44 हजाराची रोकड लंपास केली. ही घटना शुक्रवार दिनांक 5 एप्रीलला घडली. या घटनेतील आरोपी अद्याप गवसले नाहीत. त्यानंतर 28 एप्रिलला अज्ञात चोरट्याने चौकीदाराची हत्या करून लोखंडी सळाखीचे 4 बंडल चोरले होते. यातील आरोपी तब्बल 18 दिवसानंतर निष्पन्न झाले.

घोन्सा वणी मार्गावर चार अज्ञात चोऱ्यांड्यानी किराणा मालाचा पुरवठा व वसुली करणाऱ्याला भरदिवसा लुटले. ऑटो अडवून हेल्परला व ॲपे चालक यांना जबर मारहाण केली व त्याच्या जवळ असलेली पैश्याची बॅग तसेच मोबाईल जबरीने हिसकावून दुचाकीवर बसून पळून गेले. या घटनेत 88 हजार 700 रुपयांची लूट झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Img 20250103 Wa0009

क्लिष्ट गुन्ह्याचा फडशा पाडवाच लागेल
ठाणेदार अनिल बेहरानी यांनी नवी मुंबई विभागात कर्तव्य पार पाडले आहे. क्लिष्ट गुन्ह्याचा तपास कसा करायचा याचा त्यांना अनुभव असेलच. तांत्रिक बाबीचा वापर करत आरोपींचा माग शोधावा लागतो, पटवारी कॉलनीत पडलेला दरोडा व पळसोनी फाट्यावर घडलेल्या चोरी आणि हत्या प्रकरणात मोबाईल टॉवर लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय बातमीदार हे महत्वपूर्ण आहेतच यामुळेच हत्यारे गळाला लागले. दरोडा व रोड रॉबरी प्रकरणी गोपनीय बातमीदार, परिस्थितीजन्य पुरावा व तांत्रिकदृष्ट्या विश्लेषण महत्वाचे आहे. शिवाय निष्णात पोलीस कर्मचाऱ्यांना खुली सूट देत तपासाची दिशा ठरवावी लागणार आहे.
Rokhthok News