● हत्या, मारहाण, गावगुंडांचा अतिरेक वाढला
Crime News :
वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी कारवाया वाढल्या आहेत. अवैध व्यावसायिक सैराट झाले असून गावगुंडांचा अतिरेक वाढला आहे. हत्या, जबर मारहाण,चोरी, घरफोडी नित्याचेच झाल्याने पोलिसिंग संपुष्टात आले की काय असा प्रश्न उपस्थित होत असून गुन्हेगारी वाढली हे वास्तव नाकारता येणार नाही. When crime increased, policing ended..!
तरुणाचा गळा चिरून खात्मा करण्यात आल्याने पुन्हा एकदा वणी शहर हादरले आहे. शहरात वाढत्या गुन्हेगारी प्रकारांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असतानाच, शुक्रवारी दुपारी 30 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मृत तरुणाचे नाव अजय किशोर राऊत (30) रा. रंगनाथनगर, असे आहे. घटनेच्या दिवशी दुपारी सव्वा तीन वाजताच्या दरम्यान काही नागरिकांना सुनसान पडलेल्या लेआउटमध्ये रक्ताने माखलेला मृतदेह दिसला. तत्काळ वणी पोलिसांना माहिती देण्यात आली. काही मिनिटांतच पोलिस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला.
गजानन नगरी लेआउट (वडगाव रोड) येथे झुडपांमध्ये मृतदेह पडलेला होता व गळ्यावर धारदार हत्याराने वार झाल्याचे स्पष्ट दिसत होते. प्राथमिक तपासानंतर मृतदेहाची ओळख पटल्यावर पोलिसांनी तातडीने यवतमाळ येथून फॉरेन्सिक टीमला बोलावले. सायं. 6:30 वाजता टीम घटनास्थळी दाखल झाली व रात्री उशिरापर्यंत पंचनामा व तांत्रिक तपास सुरू होता.
शहरात गेल्या काही महिन्यांपासून चोरी, मारामाऱ्या व आता खूनासारख्या घटना वाढत आहेत. पोलिसांकडून गस्त व गुप्त माहिती यंत्रणा अधिक प्रभावी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. तरीदेखील अशा निर्घृण हत्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
मृतक अजय राऊत हा विवाहित असून, त्याच्या मागे पत्नी व एका लहान मुलगा असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली DB पथक, LCB पथक संशयितांचा शोध घेत असून ‘हत्येच्या मागे वैयक्तिक वैर असल्याची शक्यता’ वर्तवण्यात येत आहे.
Rokhthok






