Home सामाजिक आणि…. ठाणेदार देवदूत ठरले, मद्यपीची सुटली कायमची ‘दारु’

आणि…. ठाणेदार देवदूत ठरले, मद्यपीची सुटली कायमची ‘दारु’

● स्थानांतराची बातमी ऐकताच त्याचे मन गहिवरले

570

स्थानांतराची बातमी ऐकताच त्याचे मन गहिवरले

Social responsibility news | वणी पोलीस ठाण्यात अवघ्या सहा महिन्यांपूर्वी रुजू झालेल्या ठाणेदारांनी सातत्याने सामाजिक भान जपले. त्यांच्या कार्याची झलक त्यांच्या स्थानांतरानंतर अधोरेखित होत आहे. राजूर कॉलरी येथे वास्तव्यास असलेल्या व्यक्तीने आपबीती सांगून ठाणेदारांचा केलेला सत्कार, पोलिसातील ‘माणूस’ म्हणून उजागर झाला आहे. Thanedar’s felicitation has been exposed as the ‘man’ of the police.

Img 20250422 wa0027

प्रदीप शिरस्कर वणी ठाण्यात रुजू होताच पहिल्याच पत्रकार परिषदेत त्यांनी समाजाचे ऋण फेडण्याचे मत व्यक्त केले होते. मनोरुग्ण, रस्त्यावर भटकणाऱ्या साठी आधार बनलेल्या “संदीप” नामक तरुणाची ओळख करून दिली होती. यवतमाळात तो तरुण करत असलेल्या सामाजिक दायित्वाला आर्थिक पाठबळ मिळावे याकरिता आवाहन केले होते.

Img 20250103 Wa0009

ठाणेदारांची प्रशासकीय बदली झाली आहे, ही वार्ता राजूर येथील राजू शेषराव बनसोड यांना समजली. ते तडक ठाण्यात अवतरले आणि त्यांनी आपबिती कथन केली. दररोज दारू प्राशन करून पारिवारिक मंडळींना तो प्रचंड त्रास देत होता. पत्नी व मुली सोबत सतत भांडणे होत होती, 26 एप्रिल ला त्याने भरपूर दारू ढोसली. घरात भांडण सुरू असताना त्याच्या 16 वर्षीय मुलीने चक्क ठाणेदारांनाच फोन लावला.

ठाणेदार प्रदीप शिरसकर यांनी सगळ्या व्यथा ऐकूण घेत संजीवनी व्यसनमुक्ती केंद्रात फोन केला. तेथील कर्मचाऱ्याला बोलावून त्या मद्यपी राजुला व्यसनमुक्ती केंद्रात भरती केले. त्यानंतर राजु च्या जीवनात पूर्णपणे बदल झाला आहे.सध्या तो पूर्ववत मद्याविरहित जिवन जगत आहे. परिवार आनंदी झाला ते केवळ ठाणेदारांच्या सामाजिक दायित्वामुळे. ठाणेदार परिवारासाठी देवदूत ठरल्याचे राजू बनसोड यांनी मान्य करत ठाणेदारांचा सत्कार केला.
Rokhthok News