Home सामाजिक आणि.. ‘सूरज’च्या उपचाराची उचलली जबाबदारी

आणि.. ‘सूरज’च्या उपचाराची उचलली जबाबदारी

● पुन्हा उजागर झाले उंबरकर यांचे दातृत्व

1578

पुन्हा उजागर झाले उंबरकर यांचे दातृत्व

Yavatmal Mns News | आई अपंग तर वडील मोलमजुरी करतात, घरची परिस्थिती बेताचीच. अपघातग्रस्त मुलगा ‘सूरज’च्या उपचाराचा खर्च कसा करायचा या विवंचनेत आई-वडील होते. ग्रामस्थांनी लोकवर्गणी केली त्यातून काही प्रमाणात उपचार झाला मात्र पुढचा खर्च कसा भागवायचा हा बापड्यांना प्रश्न पडला. ही बाब मनसे नेते राजू उंबरकर यांना कळताच सूरज च्या जीवनात ‘ठणठणीत’ प्रकाश पडे पर्यंत खर्चाची जबाबदारी उचलली. The parents were in a quandary about how to spend the treatment of their son Suraj, who had an accident.

Img 20250422 wa0027

सुरज मोहन काळे असे अपघात जखमी झालेल्‍या युवकाचे नाव आहे. दि. 20 मे राजी वणी-मोहोर्ली मार्गावर सुरजचा अपघात झाला होता. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे सुरजला चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. प्रचंड खर्च होत होता, लोकवर्गणीतून जमा झालेली रक्कम संपली. लाडक्या लेकाची चिंता आई-वडिलांना सतावत होती.

Img 20250103 Wa0009

अडल्या-नडल्यांच्या मदतीला सातत्याने धावणारा एकच नेता मतदारसंघात जन्माला आला आहे. त्याचे नाव राजू उंबरकर….गरिबीची जाणीव असल्याने ते प्रत्येकांच्या मदतीला धावून जात असल्याचे वास्तव कोणीही नाकारू शकत नाही. आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी अनेकदा आपले दातृत्व सिद्ध केले आहे.

सुरजच्या उपचारासाठी पैशाची चणचण भासायला लागली आणि ग्रामस्थांनी तडक उंबरकरांचे निवासस्थान गाठले. उंबरकर यांनी परिस्थितीचे गांर्भीय बघुन उपचारासाठी मदत करण्‍याचा निर्णय घेतला. सुरजच्या उर्वरीत उपचारासाठी शर्तीचे प्रयत्‍न करण्‍यात आले. दि. 23 जुन रोजी उपचार पुर्ण करून सुरज त्‍याच्‍या गावी परत आला आणि कटुंबीय व ग्रामस्‍थांनी उबंरकराचे आभार मानले.
Rokhthok News