Home सामाजिक आणि…तरच वाचेल ‘त्या’ बालकाचे प्राण…!

आणि…तरच वाचेल ‘त्या’ बालकाचे प्राण…!

● दानशूर व्यक्ती, सामाजिक संघटनांना आवाहन

1395

दानशूर व्यक्ती, सामाजिक संघटनांना आवाहन

Rokhthok Wani | वणी तालुक्यातील लाठी या गावात काही दिवसापूर्वी शेतात खेळत असलेल्या 8 वर्षीय बालकाला खाली पडलेल्या जिवंत वीजतारेचा स्पर्श झाला. यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याचेवर उपचार सुरू आहे आजपर्यंत दीड लाख रुपयांच्या वर उपचारासाठी खर्च झाला आहे. Till date more than one and a half lakh rupees have been spent on treatment. As the financial situation is desperate, they are unable to afford further treatment.

Img 20250422 wa0027

आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पुढील उपचारासाठी ते असमर्थ आहेत. दानशूर व्यक्ती आणि सामाजिक संघटनांना आवाहन करण्यात येते की, आपली थोडीशी मदत बालकाला जीवनदान देणारी ठरणार आहे.

Img 20250103 Wa0009

पियुष संभाशीव माहुरे (08) असे गंभीर जखमी बालकाचे नाव आहे. तो आपल्या परिवारासह लाठी येथील निवासी आहे. दि. 02 मे ला तो शेतात मित्रांसोबत खेळत असताना महावितरणाच्या वीज वाहिनीचा खाली पडलेल्या जिवंत वीज तारेचा स्पर्श झाला. विजेच्या धक्क्यामुळे सदर बालकाचे हात पाय जळाले व बालकाची प्रकृती अतिशय गंभीर आहे त्याचसोबत उपचार घेत असताना त्याची पायाची 2 बोटे कापण्यात आली आहे.

उपचारा दरम्यान पियुष यांच्या वडीलाला लाखो रुपये खर्च करावे लागत आहे. वारंवार प्रयत्न करून सुद्धा MSCB ने आत्तापर्यंत कुठलीही आर्थिक मदत दिली नाही. पियुश च्या वडिलांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे पुढील उपचार घेण्याकरिता त्यांच्याकडे पैसे नाहीत. म्हणून आपण सामाजिक जाण ठेवत त्या मुलांचे प्राण वाचवण्याकरिता आर्थिक मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

● संपर्क क्रमांक ●
गणेश माहुरे (मुलाचा काका)9922603262
राहुल खारकर 9545171374

बँक खाते क्र- 33827908327
IFSC code-SBIN0000504
Google pay Phone pay-9922603262