Home सामाजिक समाजासाठी “आसान्या”चा हातभार, ‘सुमित स्मृती’ वृद्धांचा आधार

समाजासाठी “आसान्या”चा हातभार, ‘सुमित स्मृती’ वृद्धांचा आधार

● रविवारी बेलोरा येथे भव्य उद्घाटन सोहळा, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांची उपस्थिती

C1 20250902 20190681
रविवारी बेलोरा येथे भव्य उद्घाटन सोहळा, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांची उपस्थिती

Social News
समाजातील निराधार व निराश्रित ज्येष्ठांना आधार देण्यासाठी आसान्या फाउंडेशन द्वारा संचालित स्व.सुमित गुघाने वृद्धाश्रम सुरु होत आहे. यवतमाळ तालुक्यातील बेलोरा येथे रविवार दिनांक 7 सप्टेंबरला उद्घाटन सोहळा संपन्न होणार असून याप्रसंगी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. “Asanya”‘s contribution to society, ‘Sumit Smriti’ supports the elderly

Img 20250103 Wa0009

“समाजासाठी “आसान्या”चा हातभार, ‘सुमित स्मृती’ वृद्धांचा आधार” ही टॅगलाईन खऱ्या अर्थाने वृद्धाश्रमाच्या उन्नतीसाठी अधोरेखित ठरणार आहे. वृद्धाश्रमाच्या पहिल्या टप्प्यात 40 निराधार निराश्रित वृद्धांचे पालनपोषण करण्यात येणार आहे. येथे पोषक आहार, वैद्यकीय सेवा, सुसज्ज इमारत, तसेच मनोरंजनाच्या सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत.

स्व. सुमित गुघाने वृद्धाश्रमाचा उद्घाटन सोहळा रविवारी दुपारी 12 वाजता पार पडणार आहे. यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक जिल्हाधिकारी विकास मीना (IAS) तर अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता (IPS) असतील. प्रमुख अतिथी म्हणून उप संचालक, आयकर विभाग नागपूर अनिल खडसे (IRS), उप वनसंरक्षक धनंजय वायभासे (IFS), डॉ. आशिष तावडे, निवृत्त पोलीस उपअधीक्षक रमेश लोहकरे हे असतील तर सुधाकर गोविंदराव गुघाने हे सत्कारमूर्ती असेल.

आसान्या फाउंडेशन विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतीक, आर्थिक, आरोग्य विषयक सोयी सुविधा गरीब, व मागास समाजासाठी जनहितार्थ उपक्रम सातत्याने राबवितात. व्यवसाय, कला, विज्ञान, खेळ, संशोधन, या बाबींना प्रोत्साहन देण्याचे कार्य फाउंडेशनच्या माध्यमातून सुरु असते. तर पर्यावरण, वने, तलाव, जैवविविधता यांचे संरक्षण व संवर्धन करण्याबाबत जनजागृतीला प्राधान्य देण्यात येते.

आसान्या फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. सुशिल वानखेडे, उपाध्यक्ष डॉ. किशोर बनसोड, सदस्य आनंदराव मानकर, नितेश मेश्राम, स्वप्नील भगत, मृणालिनी दहिकर, सुनील मालके, महादेव सीसले, डॉ. उत्कर्ष मोहोड, संगिता पवार हे परिश्रम घेत आहेत. कार्यक्रमाचे निमंत्रक आसान्या फाउंडेशनचे संचालक आनंद देसाई, मोनिका निंबेकर, अतुल देऊळकर हे आहेत.

“वृद्धांचा सन्मान म्हणजेच खरी ईश्वरसेवा” या भावनेतून उभारण्यात आलेल्या या वृद्धाश्रमाच्या उदघाटनासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
ROKHTHOK