Home सामाजिक social work : रविवारी भव्य महाआरोग्य शिबीर, सर्वसामान्य रुग्णांसाठी ठरणार वरदान

social work : रविवारी भव्य महाआरोग्य शिबीर, सर्वसामान्य रुग्णांसाठी ठरणार वरदान

● मोफत रोगनिदान व शस्त्रक्रियांचा लाभ

C1 20250906 07163719

मोफत रोगनिदान व शस्त्रक्रियांचा लाभ

Social News :
वणी तालुक्यातील जनतेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे “भव्य महाआरोग्य शिबीर” रविवार, दिनांक 7 सप्टेंबरला पुनवट येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन आमदार संजय देरकर यांच्या हस्ते होणार असून यामध्ये विविध आजारांचे मोफत निदान, तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. social work: Grand health camp on Sunday

Img 20250103 Wa0009

आयोजित शिबिरात दत्तामध्ये उच्च शिक्षण व संशोधन संस्था, सावंगी (मेघे) तसेच आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) यांच्या कुशल डॉक्टर व तज्ज्ञ पथकांकडून सेवा दिल्या जाणार आहेत. यामध्ये वैद्यकीय तपासणी व औषधे, हृदयविकार, श्वसनविकार, सांधेदुखी, बालरोग, स्त्रीरोग, डोळ्यांचे आजार, कान-नाक-घसा, दंतचिकित्सा, कर्करोग तपासणी, हाडांचे आजार, मेंदू व नसांचे आजार, मधुमेह, मूत्रपिंडाचे आजार तसेच मोतीबिंदू, हर्निया, अंधत्व निर्मूलन याचा समावेश आहे.

आयोजित शिबिरात शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असून भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांनी केले आहे. न्यू इंग्लिश हायस्कूल, पुनवट येथे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत असेल. या शिबिराकरिता डॉ. स्वप्निल गोहोकार, नेत्रोदय डोळ्यांचे हॉस्पीटल, वणी यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.

या शिबिरात सर्व तपासण्या, उपचार व शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत. रुग्णांनी येताना पूर्वीचे वैद्यकीय कागदपत्रे व तपासणी अहवाल सोबत आणावेत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. गरजेनुसार रुग्णांना सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात मोफत दाखल करून पुढील उपचार दिले जातील.

शिबिरात मोफत भोजन व औषधोपचाराचीही सोय केली आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य रुग्णांसाठी हे शिबिर आरोग्यदायी वरदान ठरणार असून, मोठ्या प्रमाणात नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
ROKHTHOK