● मान्यवरांची उपस्थिती, समाजसेवेचा आदर्श उपक्रम
Social News :
“वृद्धांच्या संध्याकाळी जीवन सुकर व्हावे, त्यांना आधार, मायेचा स्पर्श आणि सन्मानाची वागणूक मिळावी” या भावनेतून “आसान्या फाउंडेशन”च्या वतीने उभारण्यात आलेल्या स्व. सुमित गुघाणे वृद्धाश्रमाचे उद्घाटन सोहळा बेलोरा (रुई) येथे मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. The evening of the life of the elderly, may they receive the support of the Almighty
या सोहळ्यास मुख्य वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर (IFS ) अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख उपस्थिती उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, आर्णी चे तहसीलदार वैशाख वाहूरवाघ, डॉ. आशिष तावडे, सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक रमेश लोहकरे, प्रकाश शेंडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
आयोजित कार्यक्रमात सुधाकर गुघाणे यांनी वृद्धाश्रमासाठी एक एकर जमीन दान देऊन दिवंगत सुपुत्राच्या स्मृतींना साजेसे अभूतपूर्व कार्य केले. त्यांच्या या सामाजिक योगदानाबद्दल सपत्नीक त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी डॉ. मानकर यांनी अध्यक्षीय भाषणात स्पष्ट केले की, “आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत वृद्धाश्रम ही काळाची गरज बनली आहे. ज्यांची कोणी देखभाल करणारे नाहीत, अशा वृद्धांच्या आयुष्याची संध्याकाळ सुखकर व्हावी, हीच खरी समाजसेवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना वृद्धाश्रमाबाबत “रोखठोक” मत व्यक्त केले. यावेळी उपवनसंरक्षक वायभासे म्हणाले की, “समाजाकडून मिळालेली देणगी परत समाजालाच देण्याची ही खरी परंपरा आहे. आसान्या फाउंडेशनने वृद्धाश्रम स्थापून समाजसेवेचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.”तर वाहूरवाघ यांनी अधोरेखित केले की, “वृद्धाश्रमाला बहुमूल्य जमीन देऊन गुघाणे यांनी आपल्या प्रियजनांच्या स्मृतींना जपले आहे.”
प्रास्ताविक वृद्धाश्रम व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष डॉ. सुशील वानखडे यांनी केले. आसान्या फाउंडेशनच्या कार्याचा आढावा डॉ. उत्कर्ष मोहोड यांनी सादर केला. नितेश मेश्राम यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला, तर मृणालिनी दहिकर यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. शेवटी डॉ. किशोर बनसोड यांनी आभार मानले.
यावेळी डॉ. तावडे, प्रकाश शेंडे, अंजली गिरी, शेषराव डोंगरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी भावनिक मनोगत व्यक्त केले. या यशस्वी सोहळ्यासाठी रुदेश रोकडे, सुभाष लांबे, स्वप्निल भगत, अमोल मेश्राम, ईश्वर पवार, भारत तेलंग, सुबोध मेश्राम, स्वप्निल नगराळे, नितीन पाटील, देवराव मेश्राम, विजय गवई, अशोक दुधे, वासुदेव गुघाणे, मधुकर गुघाणे, संजय भारती तसेच बेलोरा येथील ग्रामस्थ तसेच आसान्या फाउंडेशनचे विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
ROKHTHOK






