Home सामाजिक त्रिशताब्दी सोहळ्याचे साक्षीदार व्हा…वणीमध्ये इतिहास घडतोय !

त्रिशताब्दी सोहळ्याचे साक्षीदार व्हा…वणीमध्ये इतिहास घडतोय !

● तीन दिवसांचा भव्यदिव्य उत्सव !

C1 20250528 17013769

तीन दिवसांचा भव्यदिव्य उत्सव !

Wani News |– इतिहासात आपली अमीट छाप सोडणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यामाई होळकर यांचा त्रिशताब्दी जन्मोत्सव यंदा 31 मे 2025 रोजी साजरा होत आहे. वणी येथे यानिमित्ताने भव्य व ऐतिहासिक तीन दिवसीय उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. Witness the tercentenary celebrations…history is being made in Wani !

Img 20250103 Wa0009

राजमाता अहिल्याबाईंच्या कार्याचे स्मरण करत, वणी, मारेगाव, झरी येथील त्रिशताब्दी जन्मोत्सव समितीने या सोहळ्याचे आयोजन केले असून, 29 मे ते 31 मे दरम्यान विविध स्पर्धा, रक्तदान शिबीर, सांस्कृतिक कार्यक्रम, शोभायात्रा व अभिवादन सोहळ्याद्वारे त्यांचे स्मरण करण्यात येणार आहे.

आयोजित उत्सवात वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम असणार आहे. यामध्ये दिनांक 29 मे वक्तृत्व व वेशभूषा स्पर्धा, 30 मे रक्तदान शिबिर व सांस्कृतिक कार्यक्रम, 31 मे ला सायंकाळी 4 ते 7 भव्य शोभायात्रा व बाईक रॅली तर सायंकाळी 7 वाजता त्रिशताब्दी अभिवादन सोहळा भव्यदिव्य होणार आहे.

अभिवादन सोहळ्याचे उद्घाटक आमदार संजय देरकर असून अध्यक्षस्थानी डॉ. श्रीकांत भगत, तर प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. संजय बोधे उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी संजीवरेड्डी बोदकुरवार, वामनराव कासावार, विश्वास नांदेकर या माजी आमदारांसह प्रमुख अतिथी म्हणून प्रदीप बोनगीरवार, सुनील कातकडे, विजय चोरडिया, प्रा. पुरुषोत्तम पाटील, अँड. दिलीप परचाके, संगीता खाडे, शहाबुद्दीन अजानी व प्रतिभा लोंढे हे उपस्थित राहणार आहेत.

आयोजित ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळा समिती व महाराणी अहिल्यादेवी प्रबोधन मंच वणी, झरी, मारेगाव, खंडोबा-वाघोबा देवस्थान चारिटेबल ट्रस्ट वणी, महाराज यशवंतराव होळकर सार्वजनिक वाचनालय वणी, राजमाता अहिल्यामाई होळकर महिला मंच वणी, धनगर अधिकारी/कर्मचारी संघ वणी, झरी, मारेगाव व समस्त समाज बांधवांचे वतीने करण्यात येत आहे.
Rokhthok News