Home विदर्भ शेतकरी हिताचा निर्णय हेच फार्मर्स प्रोडुसरचे उद्दिष्ट

शेतकरी हिताचा निर्णय हेच फार्मर्स प्रोडुसरचे उद्दिष्ट

● संजय खाडे यांचे प्रतिपादन ● सर्वोत्‍कृष्‍ट पुरस्काराने सन्मानित

C1 20231116 09012736

संजय खाडे यांचे प्रतिपादन
सर्वोत्‍कृष्‍ट पुरस्काराने सन्मानित

Wani News | रंगनाथ स्‍वामी फार्मर्स प्रोडुसर कंपनीच्‍या माध्‍यमातुन चना खरेदी दरम्यान उत्कृष्ट व्यवस्थापन करण्यात आले. तर शेतक-यांची गैरसोय होवू नये व त्यांची पिकमालाची रक्कम खात्यात जमा करण्यात आली. यामुळेच विदर्भ ऍग्रीकल्चरल अँड प्रोडुसर कंपनी नागपुर (व्यापको) यांनी संजय खाडे यांना सर्वोत्कृष्ट पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. Sanjay Khade was honored with the best award.

रंगनाथ स्‍वामी फार्मर्स प्रोडुसर कंपनी सातत्याने शेतकरी हिताचा निर्णय घेते. शेतकऱ्यांना कोणताही त्रास होवू नये यासाठी कटिबद्ध असते. हरभरा रब्बी हंगामाकरिता चना खरेदी दरम्यान कंपनीने उत्कृष्ट व्यवस्थापन केले तसेच तात्काळ शेतकऱ्यांना खात्यावर तात्काळ पैसे मिळवून दिले. यामुळेच व्यापकोने सर्वोत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला.

विदर्भ ऍग्रीकल्चरल अँड अलाईड प्रोडुसर (व्‍यापको) कंपनीने 5 व्‍या सर्वसाधारण सभेच्‍या निमीत्‍ताने नागपुर येथील वसंतराव नाईक स्‍मृती सभागृहात पारितोषिक वितरण सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी रंगनाथस्वामी फार्मर्स प्रोडुसर कंपनीचे अध्यक्ष संजय खाडे यांना आमंत्रित करण्यात आले होते.

Img 20250103 Wa0009

आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे, व्याख्याते चंद्रशेखर भडसावळे, श्रीकांत कुवळेकर, यांची उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथी म्हणून विभागीय कृषी सहसंचालक राजेंद्र साबळे, प्रकलप संचालक (आत्मा) डॉ. अर्चना कडू, प्रज्ञा गोळघाटे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविद्र मनोहरे, उपसंचालक रेशीम संचालनालय एम.बी. ढवळे, व्यापको कंपनीचे संचालक राजेश उरकुडे, धनंजय उरकुडे व कंपनीचे संचालक ईश्वर खाडे आदि उपस्थित होते. सर्वोतृष्‍ट पुरस्‍कार मिळाल्‍याने अध्‍यक्ष खाडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Rokhthok News