● शिवसेनेची पालकमंत्र्याकडे मागणी
वणी तालुक्यातील हनुमान नगर (येनक) येथील 130 कुटुंब मागील 50 वर्षांपासून वन जमिनीवर वास्तव्यास आहेत. शासन दरबारी अनेकवेळा पाठपुरावा करून सुद्धा त्यांना वन हक्क जमिनीचे पट्टे मिळाले नाहीत. तरी त्या सर्वांना तात्काळ वन हक्क पट्टे द्यावेत अशी मागणी शिवसेनेने पालकमंत्री संदीपान भुमरे यांना केली आहे.

मागील अर्धशतकापासून वन जमिनीवर वास्तव्यास असलेल्या 130 परिवारापैकी अनुसूचित जातीच्या 10 लाभार्थ्यांना दोन आठवड्यापूर्वी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयाकडून वन हक्क पट्टे प्राप्त झाले आहेत. उर्वरित लाभार्थी सुद्धा पट्टे मिळण्याकरिता पात्र आहे.
वन जमिनीवर वास्तव्यास असलेले नागरिक ग्रामपंचायतीचा रीतसर गृहकर, पाणीकर, वीजबिल भरत आहे. उर्वरित 120 पट्टे 15 डिसेंबर पर्यंत द्यावेत अशी मागणी शिवसेनेने पालकमंत्र्याकडे केली आहे.
या सोबतच वणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी उसल्याने ती पिक सोयाबीन व कपासीच न भुतो न भविष्य असे नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडला आहे. शेत पिकांची उत्पादन क्षमता घटली आहे.
तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले होते. या कालावधीत अतिवृष्टी झाल्याने शेती पिकाला प्रति हेक्टर 50 हजार रुपये मदत मिळावी अशी मागणी शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांनी केली आहे.
वणी: बातमीदार