Home वणी परिसर आता…टारगट चिडीमार पोलिसांच्या रडारवर

आता…टारगट चिडीमार पोलिसांच्या रडारवर

पोलिसांचे विशेष पथक कार्यान्वित

शाळा, महाविद्यालये व शिकवणी वर्ग सुरू होताच शहरात रोडरोमिओंचे प्रमाण वाढले आहे. धूम स्टाईल बायकर्सची भरधाव रपेट, व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेले तरुण आणि छेडछाडीचे होणारे प्रकार लक्षात घेता ठाणेदार शाम सोनटक्के यांनी पोलिसांचे विशेष पथक कार्यान्वित करत धरपकड मोहीम राबवली आहे. यामुळे आता..टारगट चिडीमार पोलिसांच्या रडारवर आहेत.

शालेय विद्यार्थिनींना या टवाळखोर तरुणामुळे नाहक त्रास सहन करावा लागतोय. अशा प्रकरणी बदनामीच्या कारणास्तव पोलिसात तक्रार करण्यात येत नाही. शाळा महाविद्यालयासमोर टवाळखोरांचा जथ्था उभा असतो. त्याना आवर घालणे गरजेचे झाले आहे.

शहरातील वरोरा रोड, जनता शाळा परिसर, नांदेपेरा मार्ग, वडगाव रोड, विवेकानंद शाळे जवळ तसेच शिकवणी वर्ग असलेल्या परिसरात दुचाकीवरील टीबल सीट टवाळखोर भरधाव वाहने हाकताना नजरेस पडतात. तर विठ्ठलवाडी तुन जाणारा डीपी मार्ग, मुकुटंबन मार्ग, वरोरा रोड, नांदेपेरा मार्गावर सायंकाळी तसेच रात्री धूम स्टाईल बायकर्स चा धुमाकूळ बघितल्या जातो.

Img 20250103 Wa0009

शहरात युवा तरुण व्यसनाधीनतेकडे वळल्याचे प्रामुख्याने दिसते. सिगरेट्स, गांजा आणि मादक पदार्थाच्या सेवनाचे प्रकार सातत्याने वाढत आहे. पालकांनी आपला पाल्य काय धुडगूस घालतो हे तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.

पालकांनी आपल्या मुलां- मुलीवर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे. तिच्या शिकवणी व शाळा महाविद्यालयाची वेळ तपासणे तसेच मोबाईल चा होणारा वापर यावर काटेकोर लक्ष ठेवावे लागणार आहे.

पोलिसांनी शहरातील टवाळखोरांचा मुसक्या अवळण्याकरिता “दामिनी पथक” नेमणे अभिप्रेत असून शाळा, महाविद्यालय व शिकवणी वर्ग परिसरात गस्त वाढवून टारगट टवाळखोरांचे समूळ उच्चाटन केल्यास छेडछाडी च्या प्रमाणात निश्चितच घट होईल.
वणी: बातमीदार