Home वणी परिसर “एसडीओ” च्या हस्ते तहसील कार्यालयात ध्वजारोहण

“एसडीओ” च्या हस्ते तहसील कार्यालयात ध्वजारोहण

*मान्यवरांची उपस्थिती

वणी बातमीदार: 75 व्या स्वतंत्र दीना निमीत्याने येथील तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

येथील तहसील कार्यालयात सकाळी 9 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. पोलीस विभाग व टीडीआरएफ च्या जवानांनी मानवंदना दिली. राष्ट्रगीता नंतर छोटेखाणी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, आमदार संजीवरेड्डी बोडकुरवार, माजी आमदार वामनराव कासावार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे उपस्थित होते.

मनोगता नंतर पुरड येथील शहीद जवान विकास कुडमेथे यांच्या आई विमल कुडमेथे, पत्नी स्नेहा कुडमेथे व तहसील कार्यालयात उत्कृष्ट काम करणारे कर्मचारी  मंगेश सुळके, तलाठी सुनील उराडे व शिपाई अरुण बुरडकर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी  प्रभारी तहसीलदार विवेक पांडे, ठाणेदार वैभव जाधव, प्रमोद वासेकर, ओम ठाकूर, प्रमोद निकुरे, राजू येलटीवार, इजहार शेख, नगरसेवक राकेश बुग्गेवार, छोटू निमकर, संतोष डंभारे, आरती वांढरे, वंदना आवारी, विजया आगबत्तवार, मंदा बांगरे, अभिजित सोनटक्के, सविता ठेपाले, मंगला झिलपे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Img 20250103 Wa0009