Home वणी परिसर पोलीस प्रशासनाचा मूर्ती व निर्माल्य रथ सज्ज

पोलीस प्रशासनाचा मूर्ती व निर्माल्य रथ सज्ज

गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना

वणी :- अनंत चतुर्दशी पासून गणेश विसर्जनाला सुरुवात होते. विसर्जन करताना नदीवर भाविक व सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांची गर्दी होऊ नये, प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन व्हावे याकरिता पोलीस प्रशासन कार्य करीत असून गणपती विसर्जनाकरिता मूर्ती व निर्माल्य रथ सज्ज करण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने विविध नियम व अटी घालून दिलेल्या आहेत. गणेश विसर्जना करीता मिरवणुकीवर बंदी लादण्यात आली असून विसर्जनाकरिता 10 व्यक्तींनाच परवानगी देण्यात आली आहे. पालिका प्रशासनाच्या वतीने निर्गुडा नदीच्या घाटावर निर्माल्य कलश व विसर्जन कुंड निर्माण करण्यात आले आहे.

वणी पोलीस स्टेशन हद्दीत शहरात 28 तर ग्रामीण भागात 10 सार्वजनिक मंडळाने श्री ची स्थापना केली आहे. शहरात घरगुती व सार्वजनिक मंडळाच्या सुविधे करिता ठाणेदार शाम सोनटक्के यांनी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आकर्षक रथ तयार केला आहे. या रथावर पोलीस कर्मचारी सेवा देत आहे. घरगुती व सार्वजनिक मंडळांनी गणेश विसर्जना करिता संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

Img 20250103 Wa0009
Previous articleतहसीलदार श्याम धनमने यांची बदली
Next articleअभिनय स्पर्धेत प्रा हेमंत चौधरी द्वितीय
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.