Home वणी परिसर प्रजेची लेकरं शिकली पाहिजे, लालपरी टिकली पाहिजे

प्रजेची लेकरं शिकली पाहिजे, लालपरी टिकली पाहिजे

ज्वलंत समस्या रंगोळीतून रेखाटली

प्रजासत्ताक दिनी भाजपाचा सरकारवर प्रहार

वणी: प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीच्या सौजन्याने येथील चित्रकार विनोदकुमार आदे यांनी रांगोळीच्या माध्यमातून ज्वलंत समस्या रेखाटली. “प्रजेची लेकरं शिकली पाहिजे, लालपरी टिकली पाहिजे” या “टॅग” लाईन चा आधार घेत सरकारवर प्रहार करण्यात आला.

येथिल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या लगत टिळक चौकात राज्य सरकारच्या अनागोंदी कारभाराबाबत रांगोळीच्या माध्यमातून प्रहार करण्यात आला. सद्यस्थितीत शिक्षणाचा प्रश्न बिकट होत चाललाय. त्याप्रमाणेच राज्य मार्ग परिवहन महामंडळ मधील कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कर्मचारी व त्यांच्या परिवाराला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

Img 20250103 Wa0009

भारतीय जनता पार्टीच्या सौजन्याने रेखाटलेल्या रांगोळीची पाहणी करण्यासाठी आ. संजीवरेड्डी बोदकुरवार प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी विजय पिदुरकर, रवी बेलुरकर, श्रीकांत पोटदुखे, राकेश बुग्गेवार, गजानन विधाते यांची उपस्थिती होती.
वणी: बातमीदार