● महिला आक्रमक, CM यांना पाठवले निवेदन
रोखठोक | क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला समारोह समितीच्या शेकडो महिलांनी महागाई बाबत आक्रमकता अवलंबली. महागाईचे चटके सोसणाऱ्या जनतेला दिलासा द्यावा ही मागणी लावून धरत मंगळवार दि. 28 मार्चला SDO यांचे मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.


एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना टिकिट दरात पन्नास टक्के सूट दिली. याप्रमाणेच गॅस सिलेंडरच्या दरातही तात्काळ पन्नास टक्के सूट द्यावी 50% discount on ticket price for women traveling in ST bus. Similarly, 50 percent discount should be given immediately in the price of gas cylinders ही प्रमुख मागणी रेटून धरत अन्य मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले आहे.
सरकारी मालमत्तांचे खासगीकरण करण्याचा जो सपाटा लावला आहे, तो थांबवावा, शेतकऱ्यांच्या शेतमालाचा हमीभाव निश्चित करून त्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दुप्पट भाव देण्यात यावा, रास्तभाव दुकानातून राशन देतांना दुजाभाव न करता सर्वच लाभार्थ्यांना राशन देण्यात यावे, महागाई मोठ्या प्रमाणात वाढल्याने निराधारांच्याही मानधनात वाढ करण्यात यावी या मागण्या निवेदनातून मांडण्यात आल्या आहेत.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला समारोह वणी, झरी व मारेगाव येथील शेकडो महिला तहसील कार्यालयावर धडकल्या होत्या. सर्वसामान्यांशी निगडित असलेल्या मागण्याही मान्य करून जनतेला जगण्याचा आधार द्यावा अशी मागणी मोर्चातील वणी, गणेशपूर, राजूर, पळसोनी, झरपट, निंबाळा, कळमना येथील शेकडो महिलांनी केली.
वणी: बातमीदार