Home वणी परिसर महामुर्ख संमेलन….हास्‍यरंगात चिंब भिजले वणीकर

महामुर्ख संमेलन….हास्‍यरंगात चिंब भिजले वणीकर

दिग्‍गज कलावंताची उपस्थिती

रोखठोक | पन्नास वर्षांपासून सुरू असलेल्या सांस्कृतिक परंपरेतील महामूर्ख संमेलन रंगपंचमीला पार पडले. या संमेलनात वणीकर हास्‍यरंगात चिंब भिजले. सलग चार तास दिग्‍गज कलावंतांनी विविध विषयावर हास्यरंगाची उधळण केली.

शेतकरी मंदिर वणी येथे पार पडलेल्या महामूर्ख संमेलनात वणीचे नाट्य व हास्य कलावंत प्राचार्य हेमंत चौधरी व वऱ्हाडी कवी पुरूषोत्तम गावंडे यांच्या “बतावणी” या आगळ्यावेगळ्या लोककलेला बघून प्रेक्षक पोट धरून हसलेत.

महामुर्ख संमेलनात पुणे येथील सुप्रसिध्द कवी अनिल दिक्षित यांच्या “झिंगाट” कवितेने आणखीनच रंगत आणली. संमेलनाच्या उतर्राधात नागपुरचे मिमिक्री स्टार एजाज खान यांनी हास्याचे फवारे उडविले. या सर्व कलावंतांच्या सादरीकरणामूळे महामूर्ख संमेलन आगळेवेगळे ठरले.

Img 20250103 Wa0009

आयोजित संमेलनाच्या यशस्वीतेसाठी मून्नालाल तुगनायक, शशिकांत मालिचकर, जयचंद्र खेरा, संजय खाडे, राजेश महाकुलकार,भुमारेड्डी बोदकुरवार, गजानन बोढे, विलन बोदाडकर, सुनील पानघाटे यांनी परिश्रम घेतले.
वणी : बातमीदार