वणी– मुंबई येथून निवृत्त झालेले माजी न्यायाधीश विजय देशमुख यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले आहे.

विजय देशमुख हे मुंबई येथील सिटी सिव्हिल न्यायाधीश म्हणून निवृत्त झाले होते. नागपूर येथील उच्च न्यायालयात वकील म्हणून काम केले होते. त्यानंतर 1980 मध्ये ते मुंबई ला न्यायाधीश म्हणून रुजू झाले होते 14 वर्ष न्यायाधीश म्हणून कार्य केले.
निवृत्ती नंतर गेल्या काही वर्षा पासून ते आपल्या मूळ गावी वणी येथे वास्तव्यास होते. गेल्या दोन तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती त्यांचे आज पहाटे देशमुखवाडी येथील घरी निधन झाले. त्यांच्या मागे दोन भाऊ व एक बहीण असा परिवार आहे.
वणी : बातमीदार