Home वणी परिसर मारेगाव तालुक्यात डेंगू आजाराचा कहर

मारेगाव तालुक्यात डेंगू आजाराचा कहर

269

◆ एक मच्छर जिंदगी ले सकता है!

◆प्रशासनाचे अपयश

कैलास ठेंगणे-

Img 20250422 wa0027

तालुक्यांमध्ये मागील काही दिवसापासून डेंगू सदृश्य आजाराने चांगले डोके वर काढले . या आजारांमध्ये एका तीस वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याने नागरिक चांगलेच धास्तावले आहे. तर दुसरीकडे स्थानिक ग्रामपंचायती व आरोग्य यंत्रणा या सर्व प्रकाराकडे कानाडोळा करताना दिसत आहे.

Img 20250103 Wa0009

कोरोणामुळे अनेकांचे जगणे कठीण झाले आहे. अजूनही  कोरोनाचा कहर थांबलेला नाही. त्यामुळे आता कोरोना बरोबरच इतरही आजारांनी नागरिक हैराण झाली आहेत. पावसाळा सुरू असल्याने अनेक ठिकाणी मच्छरा चे प्रमाण वाढले आहे. मच्छराच्या दंशामुळे आता नागरिक आजारी पडत आहे.

मारेगाव तालुक्यातील 105 गावातील नागरिकाच्या  सेवेकरिता 56 ग्रामपंचायतीची कार्यरत आहे. ग्रामपंचायतीमार्फत गावातील नाल्या साफसफाई करून गावात फॉगिंग करणे आवश्यक आहे. याबाबतचे तसे  आदेश वरवर देण्यात आले आहे. मात्र याची अंमलबजावणी झाली की नाही याकडे कुणाचेही लक्ष नाही.