Home वणी परिसर मार्क्सवादी किसान सभा व सिटू चे निदर्शने

मार्क्सवादी किसान सभा व सिटू चे निदर्शने

170

● मोदी हटाव, देश बचाव आंदोलन

Img 20250422 wa0027

वणी बातमीदार: विविध आश्वासने देऊन केंद्रामध्ये सत्तेवर बसलेल्या मोदी सरकारने सत्तेवर बसताच जनविरोधी धोरणे, भांडवलदारी हितांची निर्णय घेत शेतकरी, कामगार, सामान्य जनतेला वेठीस धरत अघोषित आणीबाणी लादली. सरकार जनतेची बाजू ऐकून घ्यायला तयार नाही, ह्या करिता 9 आगस्ट क्रांती दिनी शेतकरी, कामगार एकत्रपणे देशव्यापी आंदोलन करीत आहे. त्याच पार्श्वभूमीवर वणीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा व सिटू च्या वतीने शंकर दानव यांचे नेतृत्वात भव्य धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात आले

Img 20250103 Wa0009

केंद्र सरकार विरोधात देशात कामगार, शेतकरी एकवटले आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आगस्ट क्रांती दिनी देशव्यापी धरणे निदर्शने आंदोलनाचा बिगुल वाजवला होता. त्याप्रमाणेच विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. प्रामुख्याने तीन काळे कृषी कायदे रद्द करावे, वीज बिल विधेयक रद्द करावे, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, पिकविम्याचा लाभ विमा कंपनी ऐवजी शेतकऱ्यांना मिळावा या मागण्यासोबतच पेट्रोल, डिझेल व जीवनावश्यक वस्तूंची केलेली प्रचंड भाववाढ ताबडतोब कमी करावी, शेतकाऱ्यांवरील कर्ज सरसकट माफ करून किसान सन्मान योजनेचं सर्वांना लाभ देण्यात यावे आदी मागण्यांना घेऊन वणी येथील उपविभागीय कार्यालयासमोर तीव्र निदर्शने शंकर दानव, कुमार मोहरमपुरी, दिलीप परचाके यांचे नेतृत्वात करण्यात आली.

याप्रसंगी आंदोलनात मनोज काळे, किसन मोहूरले, सुधाकर सोनटक्के, खुशालराव सोयाम, कवडू चांदेकर, रामभाऊ जिड्डेवार, अशोक गेडाम, ऋषी कुलमेथे, गजानन ताकसंडे, शंकर गौतरे, नंदकिशोर बोबडे, शिवा बंदूरकर, बबन चांदेकर, सुरेश शेंडे, विप्लव तेलतुंबडे, प्रीती करमरकर, अर्जुन शेडमाके आदींनी सहभागी होऊन आंदोलनाला यशस्वी केले.