● प्रभू श्रीराम जन्मोत्सवाचे भव्य आयोजन
वणी: प्रभू श्रीराम नवमी शोभायात्रा उत्सव समितीच्या वतीने जन्मोत्सव भव्यदिव्य व्हावा याकरिता रूपरेषा आखण्यात येत आहे. संपूर्ण शहर भगवे व्हावे यासाठी नियोजन करण्यात येत आहे. रांगोळीने संपूर्ण शहर सजवून घरोघरी भगव्या पताका फडकवाव्यात असे आवाहन उत्सव समितीचे अध्यक्ष रवी बेलूरकर यांनी केले आहे.

प्रभू श्रीराम जन्मोत्सव संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. प्रभू श्रीराम नवमी शोभायात्रा उत्सव समितीच्या वतीने आयोजित बैठकीत नियोजन करण्यात आले. शोभायात्रा कशी आणि कोणत्या मार्गाने निघेल याबाबत निर्णय घेण्यात आला. यावर्षी कोणतेही मोठे वाद्य न लावता भजन कीर्तन करून श्री रामाची पालखी निघेल असे ठरले.
प्रभू श्रीराम जन्मोत्सव साजरा करताना घरोघरी भगव्या पताका लावाव्या तसेच माता भगिनींनी चौका चौकात रांगोळ्या काढून उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले. आयोजित बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
आयोजित बैठकीचे अध्यक्षस्थानी दीपक नवले, प्रशांत भालेराव, राजाभाऊ पाथ्रडकर, शोभायात्रा उत्सव समिती चे अध्यक्ष रवी बेलूरकर, नितीन शिरभाते, राकेश खुराणा, अनिल आक्केवार, अरुण कावटकर, कुंतलेश्वर तुरविले, श्रीकांत पोटदुखे, संतोष डंभारे, मनोज सरमोकदम, राजू जैस्वाल, राजू गव्हाणे, अमित उपाध्ये, अनिल महापुरे, हिरामण संदलवार, शंकर घुंगरे, दीपक मोरे, विशाल दुधबळे, विजू मेश्राम, नंदू नागदेव, अवि आवारी, आशिष डंभारे, पंकज कासावार, प्रणव पिंपळे, निलेश डवरे, कौशिक खेरा, आकाश बुद्धेवार, अमर चौधरी, नितीन बिहारी, अँड प्रविण पाठक, मयूर मेहता, स्वप्नील बोंडे, कार्तिक पटेल, पावन खंडाळकर, वैभव मांडवकर, कम्लेश त्रिवेदी तसेच समितीचे पदाधिकारी सदस्य आणि सर्व श्री राम भक्त उपस्थित होते.
वणी: बातमीदार