Home वणी परिसर विदर्भवाद्यांचा रस्ता रोको व जेलभरो आंदोलन

विदर्भवाद्यांचा रस्ता रोको व जेलभरो आंदोलन

* 92 आंदोलनकर्त्याना अटक व सुटका

वणी बातमीदार: केंद्र सरकार स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीचा निर्णय घेत नसल्यामुळे विदर्भातील जनतेमध्ये तीव्र रोष निर्माण होत आहे. सातत्याने होत असलेल्या अन्यायाविरुद्ध विदर्भ राज्य आंदोलन समितीने गुरुवार दि.26 ऑगस्ट ला शहरातील साई मंदिर समोर रस्ता रोको व जेलभरो आंदोलन केले. यावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता पोलिसांनी 92 आंदोलनकर्त्याना अटक केली.

Img 20250103 Wa0009

केंद्र सरकार कडून मागील 60 वर्षांपासून विदर्भावर सातत्याने अन्याय होत आहे. शेतकरी आत्महत्या, कुपोषण, नक्षलवाद, वीज महाग, विदर्भातील युवकांच्या नोकऱ्या पळवणे असा अन्याय होत आहे. त्यामुळे विदर्भ राज्य आंदोलन समिती कडून सन 2023 साठी विदर्भ मिशन अंतर्गत ऍक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. याअंतर्गत आंदोलनाची रूपरेषा आखण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर विदर्भातील 11 जिल्ह्यातील 120 तालुक्यात  रास्तारोको व जेलभरो आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी आंदोलनकर्त्यांनी विविध मागण्या रेटून धरत प्रचंड घोषणा दिल्यात. अतिशय रहदारीच्या मार्गावर आंदोलन करण्यात आल्याने बराच वेळ वाहतुकीचा खोळंबा झाला. तसेच पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी पुरुषोत्तम पाटील, रफिक रंगरेज, देवराव धांडे, राहुल खारकर, राजू पिंपळकर, अमित उपाध्ये, संजय चिंचोळकर, प्रमोद खुरसाने, राजकीरण कहाते, अजय पोहणे, दशरथ पाटील, बालाजी काकडे, बाळकृष्ण राजूरकर, विनोद मुसळे, अलका मोहाडे, शालिनी रासेकर, राहुल झट्टे, कमलेश भगत, सुरेखा वडीचार, नीलिमा काळे, मंदा तांमगडगे, गीता दोरखंडे, चंद्रकला धूमने, मंजू मंदळे, कलावती क्षीरसागर यांचेसह मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.