◆ रोटरी क्लब चा उपक्रम
वणी :- शिक्षकदिनाचे औचित्य साधून येथील रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी च्या वतीने तालुक्यातील राष्ट्रपती व राज्य पुरस्कार प्राप्त करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन केंद्र सरकार व राज्य सरकार शिक्षकदिनी शिक्षकांना पुरस्कार प्रदान करते.
वणी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक बेबी शहनाज नसीमुद्दीन शेख व रमेश प्रभाकर बोबडे या दोन शिक्षकांना राष्ट्रपती पुरस्कार तर नगर परिषद शाळा क्र 5 चे मुख्याध्यापक गजानन कासावार यांना राज्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
त्यांच्या कार्याची दखल घेत रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी ने येथील बाजोरिया हॉल मध्ये या तिघांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. यावेळी अध्यक्षस्थानी दिलीप कोरपेनवार होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष विनोद खुराना, सचिव डॉ.परेश पटेल, प्रकल्प अधिकारी निकेत गुप्ता, अरूण कावडकर, अंकुश जैस्वाल, आशिष गुप्ता, अनिल उत्तरवार, लवलेश लाल, विनोद बाजोरिया व सर्व सभासदांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन निखील केडिया यांनी केले.





