जैताई देवस्थानचे ज्येष्ठ संचालक सुधाकर पुराणिक दिलेल्या प्रदीर्घ सेवे बद्दल व मंदिराला त्यांनी दिलेल्या उदार देणगी बद्दल शाल ,श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला .

वणी येथील शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयात शारीरिक शिक्षक म्हणून निवृत्त झाले.त्यांनी येथील जैताई मंदिरात अर्ध शतका पेक्षा अधिक काळ सेवा दिली सुधाकर पुराणिक आता यवतमाळ येथे स्थायिक झाले आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दीर्घकाळा नंतर ते देवस्थानात आले होते. आणि वणीतील आठवणींनी भावविभोर झाले होते..आरतीच्या वेळेस त्यांनी ढोलकी वाजवली व देवी समोर दोन पदे सादर केली. मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या हस्ते शाल ,श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला .
सत्काराच्या कार्यक्रम प्रसंगी माधवराव सरपटवार, तृप्ती उंबरकर ,नामदेव पारखी ,प्रशांत महाजन ,.मुलचंद जोशी , किशोर साठे , राजा जयस्वाल आणि अन्य बंधु भगिनींची उपस्थिति होती.
वणी–प्रतिनिधी