● दैवी खोड्या आणि लीलांचे नाट्यरूप
Wani News :
सुशगंगा पब्लिक स्कूलमध्ये भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव गोकुळअष्टमी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी परंपरा आणि संस्कृती जपल्या गेली. दैवी खोड्या आणि लीलांचे नाट्यरूप सादर करून बालगोपाळ विद्यार्थी हर्षोल्लासित झाले. Gokulashtami in Sushganga, traditions and culture preserved
शाळेच्या परिसरात रंगीबेरंगी सजावट, थीमॅटिक डिस्प्ले आणि दोलायमान रंगसंगतीमुळे उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांनी कृष्णाच्या बाललीला, दैवी खोड्या आणि लीलांचे नाट्यरूप सादरीकरण केले. तसेच विविध स्पर्धांमध्येही विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे अध्यक्ष प्रदीप बोंगिरवार होते तर प्रमुख अतिथी म्हणून अशोक सोनटक्के, शिक्षिका दिक्षा पिदुरकर, पॉलिटेक्निक कॉलेजच्या राणी मॅडम उपस्थित होत्या. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका देबोश्री शहा यांनी मार्गदर्शन केले.
उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले ते दहीहांडी स्पर्धेचे आयोजन. विद्यार्थ्यांच्या “हरे कृष्णा” जयघोषाने आणि भक्तिगीतांच्या स्वरांनी परिसर भक्तिमय झाला. या सांस्कृतिक सोहळ्याने विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक-सांस्कृतिक अभिमानाची भावना जागृत केली. परंपरा, संस्कृती आणि वारसा यांचे महत्व अधोरेखित करणारा हा दिवस विध्यार्थी व शिक्षकांसाठी अविस्मरणीय ठरला.
Rokhthok