● अध्यक्षपदी पोपली तर सचिव खुंगर
रोखठोक | JCI हे एक ना नफा ना तोटा अशी हि संस्था आहे. तरुणां मध्ये नेतृत्व गुणवत्ता प्रस्थापित करणे हेच संस्थेचे ध्येय आहे. 27 फेब्रुवारी ला येथील S.B. लॉन मध्ये आयोजित कार्यक्रमात 10 वा पदग्रहण सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी अध्यक्षपदी नवीन पोपली तर सचिव म्हणून गौरव खुंगर तर कोषाध्यक्ष पदावर यश श्रीवास्तव यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.
पदग्रहण सोहळ्यात जयंत पांडे, रोनित गुंडावर, अमोल गायकवाड, सुमित कुरेवार आणि अभिषेक चौधरी यांनी उपाध्यक्ष पदाची शपथ घेतली. तर JCI ने नवीन विक्रम गाठत तब्बल 18 नवीन सदस्य संस्थेला जोडले यात समस्त कार्यकारिणी व नवनिर्वाचित अध्यक्षांचा व कोषाध्यक्ष यांचा सक्रिय सहभाग होता.
याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून नाशिक येथील आंचाल अध्यक्ष जितेंद्र बोरा, मुख्य वक्ता अनुप गांधी, प्रमुख अतिथी म्हणून सौरभ बरडिया यांनी क्रार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. सर्व सदन चा उत्साह वर्धन करून नविन ऊर्जेची भावना अनावर केली. JCI चे प्रेरणास्थान नरेंद्र बरडिया यांनी सदस्यांचे आभार व्यक्त करत एकत्रतेची शिकवण दिली.
नवीन सदस्य मध्ये संजीव कुमार गुप्ता, शाश्वत बिलोरिया, भूषण कोंडावर, अंकित चींडालिया, कार्तिक देवळे, मयुर मेहता, आशिष घाटोळे, महेश पटेल, डॉ. याशिका पोपली, रिया खुंगर, तनुश्री पांडे, हिरल पटेल, मिनल कुरेवार, नेहा देवळे, विजयालक्ष्मी गुप्ता, प्रशंसा श्रीवास्तव, पूजा काळे, स्नेहा तुगनायत यांनी आपली सदस्यता ग्रहण केली.
वणी : बातमीदार






