Home वणी परिसर ‘आर्यन’च्या शिक्षणासाठी ‘रोटरी’ची मदत

‘आर्यन’च्या शिक्षणासाठी ‘रोटरी’ची मदत

● सामाजिक कार्यात रोटरी क्लब अग्रेसर

659

सामाजिक कार्यात रोटरी क्लब अग्रेसर

Rotary Club News Wani | होतकरू व हुशार विद्यार्थ्याला अकरावीत प्रवेश घ्यायचा होता. आर्थिक चणचण असल्याने पुढील शिक्षण कसे करायचे हा यक्षप्रश्न त्याच्यापुढे उभा ठाकला. ही बाब निकेत गुप्ता यांना कळली आणि रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी पुढे सरसावली. Rotary Club of Black Diamond City has always been a leader in social activities.

Img 20250422 wa0027

रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी ही नेहमीच सामाजिक उपक्रमात अग्रेसर असते. अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. कोणतीही आपत्ती असो अथवा संकट ‘रोटरी’ मदतीसाठी पुढे येते.

Img 20250103 Wa0009

शहरातील दुर्गा माता मंदिराजवळ वास्तव्यास असलेला आर्यन नागतुरे याने नुकतीच दहावीची परीक्षा चांगल्या गुणाने उत्तीर्ण केली. त्याला विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा होता मात्र घरची परिस्थिती बेताचीच असल्याने पुढील शिक्षण पूर्ण कसे करायचे या विवंचनेत तो व त्याचा परिवार होते.

ही बाब रोटरी क्लब चे अध्यक्ष निकेत गुप्ता यांना कळताच त्यांनी घरी जाऊन आर्यन ला 15 हजाराचा धनादेश दिला. व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी रोटरी क्लब चे सभासद उपस्थित होते.
Rokhthok News