● लोहार समाज संघटनेतर्फे गुणवंतांचा सत्कार
Educational News:
उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत यश मिळवलेल्या वणीतील लोहार समाजातील विद्यार्थ्यांचा सत्कार लोहार समाज संघटना वणीच्या वतीने करण्यात आला. समाजबांधव तथा पत्रकार बंडू निंदेकर यांनी याकरिता परिश्रम घेतले. The aim is to create a new spirit among students.
नुसाबाई चोपणे विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी रूपाली प्रविणा दशरथ गिरटकर हिने 90:40 टक्के गुण मिळवत प्रावीण्य संपादन केले. तर लाॅयन्स काॅंव्हेंटचे सारांश शितल गाताडे 74 टक्के व अनुष्का शितल गाताडे 73:60 टक्के यश मिळविले.
संघटनेतर्फे विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. पालकांनी या उपक्रमाबद्दल संघटनेचे आभार मानले. कार्यक्रमास बंडू निंदेकर, नितीन धाबेकर, शिरीष क्षिरसागर, जयंत गाताडे, राहुल चट्टे, रवी गाताडे आदींसह पदाधिकारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Rokhthok