Home वणी परिसर “विज्युक्टा”च्या तालुकाध्यक्षपदी प्रा. नार्लावार

“विज्युक्टा”च्या तालुकाध्यक्षपदी प्रा. नार्लावार

● तालुका कार्यकारणी जाहीर

C1 20240109 12142297

तालुका कार्यकारणी जाहीर

Wani News :- प्राध्यापकांची संघटना असलेल्या “विज्युक्टा”ची वणी तालुक्याची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. याप्रसंगी सर्वानुमते तालुकाध्यक्षपदी प्रा.आनंद श्रीपाद नार्लावार यांची निवड करण्यात आली आहे. Prof. Anand Shripad Narlawar has been elected as Taluka President.

येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात दिनांक 4 जानेवारीला तालुका कार्यकारिणीची सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती‌. या सभेमध्ये जिल्हा कार्यकारिणीच्या सुचनेनुसार नवीन तालूका कार्यकारिणी स्थापन करण्यात आली.

तालुकाध्यक्ष पदी प्रा.आनंद श्रीपाद नार्लावार, उपाध्यक्ष प्रा. गणेश महादेव लोहे, सचिव प्रा. दिलिप तुकाराम घोडमारे, सहसचिव प्रा.सुनील उध्दव गेडाम, कोषाध्यक्ष प्रा. वासुदेव भाऊराव ठाकरे, तर सदस्यपदी प्रा. घनश्याम बापुराव पाटील, प्रा.दत्ता विठ्ठलराव मालगडे, प्रा. संगीता रामेश्वर नवघरे, प्रा.पुरुषोत्तम नानाजी गोहोकर, प्रा. मनिषा अनिल नन्नावरे, प्रा.भास्कर लहानुजी पिसे यांची निवड करण्यात आली. यावेळी यवतमाळ जिल्हा विज्युक्टाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा.आनंद हूड व वणी तालुक्यातील विज्युक्टा चे सभासद उपस्थित होते.
Rokhthok News

Img 20250103 Wa0009